भारतीय क्रिकेट संघाचा धडाडीचा फलंदाज आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानला जातो. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात तब्बल तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. आता रोहितच्या नावावर आणखी एक नवा आणि अफाट विश्वविक्रम जोडला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या रोहित आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल फलंदाज आहे. मात्र, आता तो षटकारांच्या एका अशा महाविक्रमाच्या जवळ पोहोचला आहे, जो भविष्यात मोडणे कोणत्याही खेळाडूसोबत अशक्यप्राय ठरेल.
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया): आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत असून, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लॅबुशेन याच्यावर खराब ...
सध्या रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 383 षटकार जमा आहेत. जर त्याने आगामी सामन्यांमध्ये फक्त 17 षटकार मारले, तर तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 400 षटकारांचा टप्पा गाठणारा जगातील एकमेव फलंदाज बनेल. आधुनिक युगात संघ टी-20 सामने जास्त खेळत असल्यामुळे, भविष्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 400 षटकारांपर्यंत मजल मारणे कोणत्याही नव्या खेळाडूला कठीण जाणार आहे. त्यामुळे रोहितचा हा विक्रम अबाधित राहण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतल्यानंतर, रोहित आता केवळ एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. जर त्याने आगामी सामन्यांमध्ये 24 षटकार मारले, तर तो थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 षटकारांचा अभूतपूर्व टप्पा पूर्ण करेल. विशेष म्हणजे, रोहितच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकारांचा आकडाही कोणी ओलांडलेला नाही. अशात 700 षटकारांचा आकडा गाठणारा तो पहिलाच फलंदाज ठरेल.
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अत्यंत खराब सुरुवात केली. अवघ्या 39 धावांत 3 ...
सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये रोहितची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली, तरी त्याच्याकडे मालिकेचे आणखी तीन सामने बाकी आहेत. याशिवाय, यावर्षी भारताला श्रीलंकेविरुद्धही तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. म्हणजेच, हा ऐतिहासिक विश्वविक्रम रचण्यासाठी रोहितकडे एकूण सहा सामन्यांची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांच्या नजरा आता रोहितच्या या फटकेबाजीवर लागल्या असून, तो या वर्षातच हा अनोखा विश्वविक्रम करून नवा इतिहास रचेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.