Tiruchirappalli Diwali Pollution : दिवाळीनंतर तिरुचिरापल्ली धुराच्या विळख्यात; ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त फटाके फोडल्याने हवेची गुणवत्ता घसरली

दिवाळीच्या सणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असले, तरी नियम मोडून फोडलेल्या फटाक्यांमुळे तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली शहरातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. प्रशासनाने फटाके फोडण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित करून दिली होती.

तिरुपल्ली : दिवाळीच्या सणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असले, तरी नियम मोडून फोडलेल्या फटाक्यांमुळे तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली शहरातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. प्रशासनाने फटाके फोडण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित करून दिली होती. मात्र, नागरिकांनी या वेळेचे उल्लंघन करत उशिरापर्यंत फटाके फोडल्यामुळे शहरात आणि आसपासच्या परिसरात दाट धुराचे साम्राज्य पसरले आहे. रविवार संपूर्ण देशभरात आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या धुमधड्याने साजरा करण्यात आला.


वाढत्या हवा प्रदूषणाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने फटाके फोडण्यावर काही कडक मर्यादा घातल्या होत्या. तमिळनाडू सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्यासाठी सकाळी ६ ते ७ आणि संध्याकाळी ७ ते ८ अशी एकूण केवळ दोन तासांचीच परवानगी दिली होती. प्रशासनाचे स्पष्ट नियम असतानाही अनेक भागांत ठरवून दिलेल्या वेळेनंतरही मोठ्या प्रमाणावर फटाके आणि फटाक्यांची रोषणाई सुरूच होती. या निष्काळजीपणामुळे तिरुचिरापल्ली शहराच्या हवेत विषारी धूर पसरला आणि हवेची गुणवत्ता वेगाने घसरली. शहरातील टीव्हीएस टोलगेट, त्रिची विमानतळ परिसर, मुख्य पोस्ट ऑफिस रस्ता, केके नगर रोड आणि कँटोन्मेंट पंचपूर बस टर्मिनस या प्रमुख भागांमध्ये धुराचे मोठे थर साचले होते. रस्त्यांवर पसरलेल्या या दाट धुरामुळे सर्वत्र धुकं साचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे समोरचे काहीही दिसत नव्हते. दृश्यमानता (Visibility) अचानक कमी झाल्यामुळे वाहनचालकांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एवढेच नाही तर हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने अनेक रहिवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.



दिल्लीतही परिस्थिती चिंताजनक : एआयक्यू (AQI) ४०० पार


दुसऱ्या बाजूला, देशाची राजधानी दिल्लीमध्येही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांना दाट धुके आणि धुराचा सामना करावा लागला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील अनेक भागांत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) ४०० च्या वर गेला असून हवा 'अतिगंभीर' श्रेणीत पोहोचली आहे. दिल्लीतील दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) परिसरात सर्वात जास्त ४३९ AQI नोंदवला गेला. याशिवाय बुरारी क्रॉसिंग (४३३), विवेक विहार (४२१), उत्तर दिल्ली विद्यापीठ परिसर व सोनिया विहार (प्रत्येकी ४१९) आणि बावना (४१८) या भागातही प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. जहांगीरपुरी आणि आयटीओ (ITO) परिसरातही हवेची पातळी ४०० च्या पार गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Comments
Add Comment

अंत्यसंस्काराला जाताना काळाचा घाला! झारखंडमध्ये भीषण अपघातात 5 जण जागीच ठार, 14 जण जखमी

रांची : झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील चौपारण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दनुआ घाटीत सोमवारी एक भीषण

गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जनता दर्शन; नागरिकांच्या तक्रारींवर संवेदनशीलतेने कार्यवाहीचे निर्देश

सोमवारी (९ नोव्हेंबर) सकाळी गोरखपूर दौऱ्यावर असताना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ

वंदे भारतची तुफान लोकप्रियता! एका मार्गावर व्याप्ती चक्क 189 टक्क्यांवर; प्रवाशांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद

Vande Bharat Express : भारतीय रेल्वेचा आधुनिक चेहरा ठरलेल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'ने प्रवाशांच्या मनात वेगळे स्थान निर्माण

दिवाळीचा आनंद क्षणात संपला! मध्य प्रदेशात भीषण आग, 2 कुटुंबांतील 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू

भोपाळ: दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा करत असताना मध्य प्रदेशातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना

Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेसचा भन्नाट नियम! आता पाळीव प्राण्यांसाठी खास सोय, पण बुकिंगचे नियम वाचले का?

Indian Railways News: अनेकांना लांबच्या प्रवासाला जाताना आपल्या पाळीव प्राण्यांना घरी सोडणे कठीण जाते. विशेषतः कुटुंबासोबत

Delhi Firecracker Accident : मित्रांसोबत फटाके फोडताना भयंकर घडलं! अल्पवयीन मुलाच्या पोटात रॉकेट घुसला अन्...

दिल्ली : दिवाळीचा सण एका कुटुंबासाठी दुःखद ठरला आहे. दिल्लीतील नरेला परिसरात फटाके फोडताना रॉकेट पोटात