Gmail स्टोरेज वारंवार फुल होतोय? मग ‘ही’ ट्रिक वापरून काही सेकंदातच करा फ्री स्पेस

Gmail Storage Tips: तुमचं Gmail स्टोरेज वारंवार फुल होतोय का? त्याचे कारण Emails नसून Google Photos आणि Google Drive मधील Photos, Videos किंवा Files असण्याची शक्यता आहे. गुगलकडून प्रत्येक युजरला 15 GB फ्री क्लाउड स्टोरेज दिले जाते. मात्र, हे स्टोरेज फक्त Gmail साठीच मर्यादित नसून Google Drive आणि Google Photos साठीही हे स्टोरेज आहे. बऱ्याचदा आपले Google चं स्टोरेज लवकर भरतं, त्यामुळे स्टोरेज फुलचा मेसेज येऊ लागतो. जर तुम्हाला पैसे खर्च न करता डिजिटल स्पेस मोकळी करायची असेल, तर 'या' सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा.

Gmail मध्ये असे अनेक जुने मेसेज असतात, ज्यांच्यासोबत फोटो, व्हिडिओ किंवा मोठे डॉक्युमेंट्स अटॅच केलेले असतात. हे शोधण्यासाठी जीमेलच्या सर्च बारमध्ये फाईल साईझनुसार फिल्टर वापरा. जुने आणि गरज नसलेले अटॅचमेंट्स असलेले ईमेल तपासून ते त्वरित डिलीट करा.

न्यूजलेटर, ऑफर्स आणि सोशल मीडिया अलर्ट्समुळे इनबॉक्स झपाट्याने भरतो. Gmail मधील 'Promotions' आणि 'Social' टॅबमध्ये जाऊन जुने व उपयोगात नसलेले Email डिलिट करून टाका. शिवाय, वारंवार येणाऱ्या आणि गरज नसलेल्या न्यूजलेटरपासून सुटका मिळवण्यासाठी 'Manage Subscriptions' पर्यायाचा वापर करून Unsubscribe करा.

केवळ Gmail नाही तर Google Drive मधील स्टोरेज सेक्शन उघडून जास्त स्टोरेज असलेल्या आणि नको असलेल्या फाईल्स सुद्धा डिलिट करा. Google Photos मधील जुने किंवा ड्युप्लिकेट फोटो आणि व्हिडिओ डिलीट करा. नवीन फोटो अपलोड करताना 'Storage Saver' क्वालिटी निवडल्यास तुमच्या Google Storage ची मोठी बचत होते.

आपण डिलीट केलेले Email थेट 'Trash' फोल्डरमध्ये राहतात, त्यामुळे सुद्धा Google Storage वाया जाते. शिवाय, 'Spam' फोल्डरमधील अनावश्यक मेसेज सुद्धा डिलीट करा. फोनमधील जीमेल ॲप उघडून प्रोफाइल फोटोवर टॅप करा आणि 'Clean up space' चा वापर करून एका क्लिकवर सर्व Data Clean करा.

जर तुमचे जुने Email महत्त्वाचे असतील आणि तुम्हाला ते डिलीट करायचे नसतील, तर त्यांचा बॅकअप पीसी किंवा पेनड्राइव्हवर घेऊन नंतर गुगल अकाउंटवरून डिलिट करू शकता. या सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही अगदी सहज तुम्ही तुमचे Google Storage कायम फ्री ठेवू शकता.
Comments
Add Comment

Old Phone Reuse: जुना स्मार्टफोन तुमच्या गाडीसाठी डॅशकॅम म्हणून वापरता येतो; कसे ते जाणून घ्या

Old Phone Reuse: रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी आणि रोड रेजच्या घटना बघता, आपल्या चारचाकी गाडीत डॅशकॅम बसवणे गरजेचे आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या

IRCTC कडून मुंबईहून ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वे चालवणार, अशी आहे योजना

मुंबई: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC), पश्चिम विभाग, मुंबईतर्फे भारत गौरव विशेष पर्यटन

700 ग्रॅम बाळाचं वजन 3.3 कि.ग्रॅमवर नेलं; केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळाला दिलं जीवनदान

मुंबई: मुंबईतील केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी एका बाळाला जीवनदान दिले आहे. आई 7 महिन्यांची गर्भवती असतानाच

नवी मुंबईतील गोळीबारात दोन तरुणी जखमी, पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल

नवी मुंबई: गेल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईतील कोपर खैराणेमध्ये, दोन सख्ख्या बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार झाल्याची

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा तडाखा! Syed Mushtaq Ali Trophy 2026 साठी ‘डेंजरस’ संघ जाहीर!

मुंबई: क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026' (Syed Mushtaq Ali Trophy 2026) या अत्यंत रोमांचक