Old Phone Reuse: रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी आणि रोड रेजच्या घटना बघता, आपल्या चारचाकी गाडीत डॅशकॅम बसवणे गरजेचे आहे. एखादा अनपेक्षित अपघात झाल्यास किंवा पोलिसांकडे खोटी तक्रार दाखल झाल्यास, हा कॅमेरा व्हिडिओ पुरावा पुरवण्याचे काम करतो. त्यामुळे ते अधिकाधिक महतत्वाचे आहे. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या डॅशकॅमची किंमत खूप जास्त असल्यामुळे, इच्छा असूनही अनेक लोक ते खरेदी करत नाहीत.
परंतु, जर बजेटच्या अडचणींमुळे तुम्ही तुमच्या कारमध्ये डॅशकॅम लावत नसाल, तर हजारो रुपये खर्च करण्याची गरज अजिबात नाही. तुम्ही तुमच्या घरात पडून असलेला जुना अँड्रॉइड स्मार्टफोन वापरून हे काम अगदी विनामूल्य करू शकता. आजकाल वाढत्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन देखील वेगाने अपग्रेड होत आहेत. अशा परिस्थितीत लोक 2 ते 3 वर्षे त्यांचे फोन वापरतात आणि नंतर नवीन फोन खरेदी करतात, हेच जुने फोन जे तुम्हाला निरुपयोगी वाटतात तेच तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. फक्त एक मोबाईल होल्डर, एक कार चार्जर आणि एका सोप्या युक्तीने, तुम्ही तुमच्या जुन्या फोनला एका शक्तिशाली डॅशकॅममध्ये रूपांतरित करू शकता. कसे ते जाणून घेऊया.
डॅशकॅम बनवायचे कसे?
सर्वप्रथम जुना फोन पूर्णपणे रिकामा करणे. एकदा तुम्ही फोन कार रेकॉर्डिंगसाठी कॉन्फिगर केला की, तो सामान्य कामांसाठी वापरता येत नाही. म्हणून, सगळ्यात आधी तुमच्या जुन्या फोनमधील महत्त्वाचे फोटोज, व्हिडिओज आणि डेटाचा बॅकअप घ्या आणि नंतर तो फॅक्टरी रीसेट करा. यामुळे फोनची संपूर्ण स्टोरेज मोकळी होईल आणि तो फ्रीझ होण्यापासून वाचेल.
आता तुमचा फोन रीसेट केल्यानंतर, त्यातील सर्व अनावश्यक ॲप्स, सोशल मीडिया आणि गेम्स पूर्णपणे काढून टाका, जेणेकरून बॅकग्राउंडमध्ये काहीही चालू राहणार नाही. तसेच, सर्व नोटिफिकेशन्स बंद करा आणि फोन 'डू नॉट डिस्टर्ब' मोडवर ठेवा. यामुळे गाडी चालवताना तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये कॉल्स किंवा मेसेजेस येणार नाही.
तुमचा फोन आता क्लिअर केल्यानंतर, तुम्हाला प्ले स्टोअरवरून एक मोफत डॅशकॅम ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यासाठी ड्रॉइड डॅशकॅम हा एक उत्तम पर्याय आहे, जो एकही पैसा खर्च न करता अनेक वैशिष्ट्ये देतो. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर, त्याला कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन आणि स्टोरेजसाठी परवानग्या द्या. सततच्या रेकॉर्डिंगमुळे तुमचा फोन जास्त गरम होऊ नये म्हणून व्हिडिओची गुणवत्ता 4K ऐवजी 1080p वर सेट करा.
Farah Khan Fake Viral Video: चित्रपट निर्माती फराह खान आजकाल सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. सध्या ती चित्रपटांपेक्षा तिच्या ब्लॉग्समधून जास्त लोकप्रियता आणि पैसा ...
शिवाय ॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन लूप रेकॉर्डिंग चालू करा. तसेच व्हिडिओचा वेळ पाच मिनिटांवर सेट करा. लूप रेकॉर्डिंगमुळे तुमच्या फोनची मेमरी कधीही पूर्ण भरत नाही. स्टोरेज भरायला लागताच, ॲप आपोआप सर्वात जुना व्हिडिओ डिलीट करते आणि नवीन व्हिडिओ सेव्ह करायला सुरुवात करते, ज्यामुळे सतत रेकॉर्डिंग सुरू राहते.
या ॲपला खऱ्या डॅशकॅमचा अनुभव देण्यासाठी, तारीख, वेळ, जीपीएस लोकेशन आणि वेगमर्यादा सक्षम करा.
अपघात झाल्यास किंवा दंड आकारल्यास ही व्हिडिओ माहिती पुरावण्यासाठी उपयोगी पडते. तसेच, ॲपचे जी-शॉक सेन्सर फीचर सक्षम करा, जे अचानक धक्का लागल्यास किंवा टक्कर झाल्यास व्हिडिओ आपोआप लॉक करते, ज्यामुळे तो डिलीट होण्यापासून रोखला जातो.
त्यानांतर एक मजबूत माउंट वापरून फोन विंडशील्डवर, रिअरव्ह्यू मिररच्या जवळ लावा. कॅमेरा थोडा खाली ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचा रस्ता आणि तुमच्या गाडीचे हूड स्पष्टपणे दिसेल. सतत व्हिडिओ आणि जीपीएस चालू ठेवल्याने बॅटरी लवकर संपते. त्यामुळे, तुमचा फोन नेहमी कार चार्जरला जोडून ठेवा आणि त्याची कॉर्ड डॅशबोर्डपासून दूर ठेवा.