मुंबईतील १० अग्निशमन केंद्र बनणार ऊर्जेत स्वावलंबी, भायखळा मुद्रणालयासाह १० अग्निशमन केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार

मुंबई महापालिकेने ४.२६ कोटी रुपये खर्चून १० अग्निशमन केंद्रे आणि भायखळा मुद्रणालयावर ७०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पालिकेचा वीज बिल खर्च वाचणार असून, कार्बन उत्सर्जन कमी होऊन आपत्कालीन परिस्थितीतही अग्निशमन केंद्रांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होईल.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने आता वीज बचतीचा मार्ग अवलंबवण्यास सुरुवात केली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या कार्यालयांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीचा संकल्प केला आहे. यापूर्वी भांडुप संकुलांसह काही शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवल्यानंतर आता महापालिकेच्यावतीने काही अग्निशमन दलाची केंद्र तसेच भायखळा येथील महानगरपालिका मुद्रणालयाच्या छतांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एकूण ११ ठिकाणी निर्माण केल्या जाणाऱ्या या सौर ऊर्जा प्रकल्पांतून सुमारे ७०० किलोवॅट क्षमतेची वीज निर्मिती केली जाणार आहे.

महापालिकेच्या 'नेट झिरो म्युनिसिपल अॅक्शन प्लॅन' अंतर्गत 'रूफटॉप सोलर' प्रणालीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामध्ये कुलाबा, दादर, नरिमन पॉइंट, वांद्रे, बोरीवली, वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव, दिंडोशी, मुलुंड आणि मानखुर्द या १० अग्निशमन केंद्रांवर, तसेच भायखळा येथील महानगरपालिका मुद्रणालयावर अशाप्रकारे एकूण ११ ठिकाणी हे प्रकल्प साकारण्यात येणार आहेत.

पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेचा प्रभावी वापर म्हणून अक्षय ऊर्जेचा वापर केला जात असून हरितगृह वायू व कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संवर्धन राखण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीतही अग्निशमन केंद्रांना अखंडित व स्वावलंबी वीजपुरवठा केला जावू शकतो,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



या सौर ऊर्जा प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज संबंधित अग्निशमन केंद्रे व मुद्रणालय इमारतीच्या स्वतःच्या वापरासाठी असल्याने पारंपरिक विजेवरील अवलंबित्व व वीज देयकाचा खर्च कमी होईल. तसेच महापालिकेच्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टासही हातभार लागेल. मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कार्यरत असणाऱ्या अग्निशमन दलाने आधुनिकतेची कास धरत 'हरित आणि शाश्वत मुंबई' घडवण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी तब्बल ४.२६ कोटी रुपये खर्च केला जाणार असून या कामांसाठी सेक्वन ग्रीन्स सोलर सिस्टीम्स प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

मुंबई हवामान कृती आराखड्याच्या प्राथमिक मूल्यांकनात "ऊर्जा आणि इमारती" हे सहा प्रमुख क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. पारंपरिक औष्णिक वीजनिर्मितीमुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणे, हे या आराखड्याचे एक उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कुठल्या अग्निशमन दलाच्या केंद्रांवर किती क्षमतेचा असणार प्रकल्प



  • बोरीवली : ७५ किलोवॅट (सर्वाधिक)

  • वांद्रे व मुलुंड : प्रत्येकी ६५ किलोवॅट

  • दादर व मानखुर्द : प्रत्येकी ६० किलोवॅट

  • कुलाबा : ५५ किलोवॅट

  • नरिमन पॉइंट : ५० किलोवॅट

  • वांद्रे-कुर्ला संकुल व दिंडोशी : प्रत्येकी ३५ किलोवॅट

  • गोरेगाव : ३० किलोवॅट

  • भायखळा मुद्रणालय : १०० किलोवॅट (बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीसह) व ७० किलोवॅट (बॅटरी प्रणालीशिवाय)

Comments
Add Comment

मुंबई फटाक्यांनी पेटतेय! एकाच दिवसांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या १३७ घटना

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजीवर न्यायालयाने निर्बंध घातलेले असताना त्यानुसार महापालिका

महापालिकेच्या विधी खात्यातील ३५ पदे कायमचीच केली रद्द, कनिष्ठ कायदा अधिकारीपासून ते फलक परिचरपर्यंतच्या पदांचा समावेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या विधी खात्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात असून महापालिका

प्रॉपर्टी कार्डवर अखेर मुंबई महापालिकेची नावे चढली, तब्बल १८९० भूभागांच्या मालमत्ता कार्डवर नाव नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या ताब्यात आज अनेक भूखंड असले तरी यातील बहुतांशी भूखंडांच्या मालमत्ता

IRCTC कडून मुंबईहून ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वे चालवणार, अशी आहे योजना

मुंबई: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC), पश्चिम विभाग, मुंबईतर्फे भारत गौरव विशेष पर्यटन

700 ग्रॅम बाळाचं वजन 3.3 कि.ग्रॅमवर नेलं; केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळाला दिलं जीवनदान

मुंबई: मुंबईतील केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी एका बाळाला जीवनदान दिले आहे. आई 7 महिन्यांची गर्भवती असतानाच

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी! कुटुंबीयांना दिला मदतीचा विश्वास

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत दिवाळी