इंग्लंड दौऱ्यातील तीन खेळाडू आऊट
रचिन रवींद्रच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्या महिन्यांपासून मैदानापासून दूर होता. मात्र आता त्या दुखापतीतून सावरला असून संघात पुनरागमन झालं आहे. असंच काहीसं ब्लंडलच्या बाबती आहे. क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता, तर डेवॉन कॉनवे तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी सराव करताना कन्कशनचा बळी ठरला होता. पण संघाची निवड झाल्यानंतर या तिन्ही संघाचं पुनरागमन झालं आहे. त्यामुळे हे तिन्ही खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड संघातील बहुतांश खेळाडू या संघा आहेत. फक्त या संघात जॅक फॉल्क्स, बेन सियर्स आणि विल ओ राउर्की नाहीत. या तिन्ही खेळाडूंना दुखापत असल्याने त्यांची निवड झालेली नाही. तर जेकब डफीला कसोटी संघात सहभागी केलं आहे.
कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ: टॉम लॅथम ( कर्णधार), रचिन रवींद्र, डेवॉन कॉनवे, टॉम ब्लंडल, जेकब डफी, मॅट हेनरी, काइल जॅमीसन, डॅरेल मिचेल, हेनरी निकल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, नॅथन स्मिथ, ब्लेयर टिकनर आणि विल यंग.
टीम इंडिया वचपा काढणार का?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे. हा कसोटी सामना 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान असणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान क्राइस्टचर्च येथे होणार आहे. 2024 नंतर दोन्ही संघ कसोटी मालिका खेळणार आहे. 2024 मध्ये न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा न्यूझीलंडने भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लिन स्वीप दिला होता. यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं होतं.