IPL 2027 Trade: हार्दिक पांड्याला पंजाब किंग्समध्ये जाताच फायदा, मुंबई इंडियन्समध्ये अर्शदीप सिंगचं जैसे थे

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींनी संघ बांधणी सुरू केली आहे. गोव्यात होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी ट्रेड करण्याची धडपड सुरू झाली आहे. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांची ट्रेड चर्चेचा विषय आहे. नेमकं काय ते जाणून घेऊयात

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. असं असताना ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. या ट्रेड विंडोत हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्या आदलाबदलीची जोरदार चर्चा होती. अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. हार्दिक पांड्या पंजाब किंग्सकडून, तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद होतं. पण आता त्याला पंजाब किंग्समध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळावं लागणार आहे. तर मुंबई इंडियन्सला अर्शदीप सिंगच्या रुपाने टी20 स्पेशालिस्ट गोलंदाज मिळाला आहे. तसं पाहिलं तर ही ट्रेड डिल हार्दिक पांड्याला फायद्याची ठरली ठआहे. कारण या ट्रेड डिलमध्ये हार्दिक पांड्याच्या रकमेत वाढ झाली. तर अर्शदीप सिंगला आहे त्या किमतीत मुंबई इंडियन्स संघात जावं लागलं आहे.

हार्दिक पांड्याच्या रकमेत वाढ


आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याला 16.35 कोटी इतकी रक्कम देत होता. तर पंजाब किंग्स अर्शदीप सिंगसाठी 18 कोटी मोजत होती. या ट्रेड डिलमध्ये अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून 18 कोटी मिळणार आहे. म्हणजेच त्याच्या रकमेत काहीही वाढ झालेली नाही. पण हार्दिक पांड्या पंजाब किंग्सकडून 18 कोटी रक्कम मिळेल. म्हणजेच त्याच्या आयपीएल उत्पन्नात 1.65 कोटींची वाढ झाली आहे. हार्दिक पांड्या आयपीएल 2015 मध्ये 10 लाखांच्या बेस प्राईसवर मुंबई इंडियन्स संघात सामील झाला होता. 2017 पर्यंत त्याला हीच रक्कम मिळाली. त्यानंतर 2018 च्या मेगा लिलावापूर्वी त्याला मुंबई इंडियन्सने 18 कोटी दिले. ही रक्कम 2021 पर्यंत कायम होती. त्यानंतर आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समध्ये गेला आणि त्याला 15 कोटी मिळाले. 2023 पर्यंत गुजरात टायटन्सचा भाग होता. 2024 मध्ये ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा संघात घेतलं आणि 15 कोटी दिले. त्यानंतर 2025 आणि 2026 मध्ये त्याला मुंबई इंडियन्सकडून 16.35 कोटी मिळाले.




हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स भाग असताना मिळवले चार जेतेपद


हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग असताना चार वेळा जेतेपद मिळवलं आहे. त्यानंतर 2022 मध्ये कर्णधार म्हणून गुजरात टायटन्सचा भाग झाला आणि पहिल्याच पर्वात जेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने पुन्हा अंतिम फेरी गाठली. पण उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघात आला, पण छाप काही सोडता आली नाही. पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने तीन पर्व खेळली. त्यापैकी एकाच पर्वात पात्रता फेरी गाठू शकले. पण उर्वरित दोन पर्वात मुंबई इंडियन्स संघाची स्थिती एकदम नाजूक होती.
Comments
Add Comment

कर्णधार गिल लग्नबंधनात अडकणार? रोहित शर्मा शोमध्ये शुभमन बद्दल काय म्हणाला?

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचा 'फॅमिली फुल हाऊस विथ रोहित' हा शो सध्या बऱ्याच लोकप्रिय होत आहे. या शोच्या

IPL 2027 Mega Auction: हार्दिक पांड्या पंजाबमध्ये, अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये! 18 कोटींचा मोठा ट्रेड?

भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक अतिशय मोठी आणि डोळे दिपवणारी खळबळजनक बातमी समोर येत आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग

IND vs NZ तिसरा वनडे सामना निकालाविना, भारताकडे दोन संधी; तर न्यूझीलंडला मालिका गमवण्याची भीती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्कमध्ये होणार होता. पावसाच्या

इंग्लंड क्रिकेट संघात मोठा बदल! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अनकॅप्ड खेळाडूला थेट संधी, पाहा संपूर्ण संघ

England vs South Africa : इंग्लंड क्रिकेट संघाने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आपल्या कसोटी संघाची घोषणा केली आहे. डिसेंबर

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा तडाखा! Syed Mushtaq Ali Trophy 2026 साठी ‘डेंजरस’ संघ जाहीर!

मुंबई: क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026' (Syed Mushtaq Ali Trophy 2026) या अत्यंत रोमांचक

INDW vs SAW: भारतीय महिला संघाची घोषणा; दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात झाले दोन मोठे बदल

भारतीय महिला संघ स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आणखी एका मालिकेसाठी सज्ज झाला आहे. नुकतंच स्मृती मंधानाच्या