Wednesday, November 11, 2026

कर्णधार गिल लग्नबंधनात अडकणार? रोहित शर्मा शोमध्ये शुभमन बद्दल काय म्हणाला?

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचा 'फॅमिली फुल हाऊस विथ रोहित' हा शो सध्या बऱ्याच लोकप्रिय होत आहे. या शोच्या नुकत्याच झालेल्या भागामध्ये विनोदी कलाकार आणि 'शार्क टँक' चे परीक्षक सहभागी झाले होते. स्टॅंड अप कॉमेडियन आणि शार्क टँकच्या परीक्षकांमध्ये सुरू असलेल्या संवादादरम्यान, रोहित शर्माने शुभमन गिलच्या लग्नाबद्दल एक मोठे विधान केले आहे. स्टँडअप कॉमेडियन आकाश गुप्ता अनुपम मित्तल यांना म्हणाला,'माझा प्रश्न आहे की, ज्या प्रत्येक कर्णधाराने लग्न केले आहे, त्याने त्याच वर्षी विश्वचषक जिंकला आहे.'

अनुपम मित्तल यांनी विचारले, 'हे कसे शक्य आहे? रिकी पॉंटिंगचे लग्न २००२ मध्ये झाले आणि त्यांनी २००३ मध्ये विश्वचषक जिंकला. महेंद्रसिंग धोनीचे २०१० मध्ये लग्न झाले आणि आम्ही २०११ मध्ये विश्वचषक जिंकला.' आकाश गुप्ता यावर पुढे म्हणाला, 'आता पुढच्या वर्षी विश्वचषक आहे तेव्हा तुम्ही शुभमन गिलच्या लग्नाचं बघावं अशी आमची इच्छा आहे.' यावर अनुपम मित्तल म्हणाले, 'खरं सांगायचं तर आम्ही त्याचाशी संपर्क साधला होता.'

त्याने नाही म्हटले त्याला आता लग्न करायचे नाही. यावर रोहित शर्मा म्हणाला, 'नाही मित्रा, विश्वचषक जिंकण्यासाठी जे काही लागेल ते मी करेन.' रोहित शर्माच्या या उत्तराने कार्यक्रमात धमाल आली. रोहित शर्माने शुभमन गिलच्या लग्नाचा विषय का काढला? असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला आहे. रोहित शर्माच्या शोच्या प्रोमोनंतर चाहत्यांना खिल्ली उडवण्याचा मोह आवरता आला नाही. एकाने लिहिले की, गोष्टी आता इथपर्यंत आल्या आहेत. काही लोकांनी रोहित तुला नाही शुभमनला लग्न करायचे आहे, असे सांगितले. तर काही प्रेक्षक व्हिडिओ पाहून मनभरून हसत होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >