Thursday, November 12, 2026

Maatrubhumi: सलमान खानच्या 'मातृभूमी'मधील 5 संवाद प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झाले

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटातील काही डायलॉग हिट झाले आहेत. ट्रेलरमधील अनेक संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहेत. ते कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया.

Maatrubhumi: बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात घडलेल्या भारत-चीन सैनिकांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंहही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील ॲक्शन सीन्स आणि सलमानचा लूक यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटातील काही डायलॉग हिट झाले आहेत. ट्रेलरमधील अनेक संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहेत. ते कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया.

सलमान खान आणि चित्रांगदा सिंग यांचा बहुप्रतिक्षित 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' हा चित्रपट येत्या 4 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. पण प्रेक्षकांचे खरे लक्ष वेधून घेत आहेत ते या चित्रपटातील संवाद. हे संवाद सोशल मीडियावर वेगाने आपली छाप पाडत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाचे संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. 'मातृभूमी' यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु तो पुढे ढकलून शेवटी 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मातृभूमी चित्रपटातील 5 हिट संवाद

1. "व्वा! तुम्हाला भाषा समजते, तर भावनाही समजतील!"

2. ‘शेजवानमध्ये काहीतरी काळं आहे...’

3. “आम्ही सैनिक आहोत, अशा दिवसांसाठीच आमची निर्मिती झाली आहे.”

4. “तुम्ही ऐकलेच असेल की एक बिहारी शंभर बिहारींच्या बरोबरीचा असतो!”

5. “मृत्यूची भीती का बाळगावी, तो येणारच आहे!”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >