Mumbai Crime News: लोकलमध्ये संतापजनक प्रकार! तरुणीची छेडछाड; विरोध करताच रुळांवर ढकलले

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार घडला आहे ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Mumbai Crime News: बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीची छेडछाड केल्यानंतर तिला रेल्वे रुळांवर ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 नोव्हेंबर रोजी नायगाव रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला. या घटनेत तरुणीचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने कोपरापासून कापावा लागला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



छेडछाडीला विरोध केला, आरोपीने रुळांवर ढकलले


पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, ती बोरिवलीहून नायगावला जाण्यासाठी लोकलमध्ये चढली होती. नायगाव स्थानक जवळ येत असताना एका व्यक्तीने तिच्या छातीजवळ चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून छेडछाड केली. तरुणीने त्याला विरोध केला आणि चप्पल मारली. त्यानंतर दोघांमध्ये वाद आणि शिवीगाळ झाली.


तरुणीच्या आरोपानुसार, नायगाव स्थानकात लोकल थांबलेली असताना आरोपीने तिला जोरात धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांच्या मधून रेल्वे रुळांवर पडली. फलाटावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात चाकाखाली आला. या अपघातात तिचा हात कोपरापासून कापावा लागला. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, 16 टाके पडल्याचे तिने सांगितले.



'मला फक्त न्याय हवा'; पीडितेची आपबिती


या घटनेबाबत बोलताना पीडित तरुणीने आपल्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. आरोपीने वारंवार चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तिने केला. विरोध करूनही तो थांबला नाही. त्यानंतर झालेल्या वादात त्याने आपल्याला रुळांवर ढकलल्याचे तिने सांगितले.


या घटनेमुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त करत तिने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. घरातील अनेक जबाबदाऱ्या आपण सांभाळत होतो, मात्र आता एका हाताने काम करणे कठीण झाल्याचेही तिने सांगितले.



गुन्हा दाखल; कलमे वाढवण्याची मागणी


घटनेनंतर आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता. 6 नोव्हेंबर रोजी भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 117(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, खुनाच्या प्रयत्नाचे कलम 109 लागू न केल्याबद्दल पीडितेच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.



Comments
Add Comment

अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेनंतर लग्नाची परवानगी, सुधारित अग्निपथ योजनेत मोठा बदल

सशस्त्र दलांमध्ये सेवा देणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकारने सुधारित अग्निपथ योजनेत महत्त्वाचा बदल केला आहे.

QR Code Fraud : 'अरे.. स्कॅम झालाय!' मिठाईच्या दुकानात QR कोडची केली अदला बदल, ग्राहकांचे पैसे लंपास; व्हिडिओ व्हायरल

Crime News: दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत एका तरुणाने मिठाईच्या दुकानातील पेमेंट QR कोड बदलून ग्राहकांची रक्कम

ब्रुकलिनमध्ये इमारतीचा भाग कोसळला, 2 ठार, 17 जखमी, एकजण अजूनही ढिगाऱ्याखाली

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन भागात बुधवारी दुपारी एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची मोठी दुर्घटना

Mumbai Crime News : कांदिवलीत ड्रग्ज माफिया टिपूच्या टोळीवर मोक्का; तीन साथीदारांना अटक, 17 गुन्ह्यांची नोंद

Mumbai Diwali fire: मुंबईत पाच दिवसांमध्ये एकूण 499 आगीच्या दुर्घटना; फटाक्यांमुळेच लागल्या तब्बल 333 आगी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत दीपावलीच्या उत्सवामध्ये मोठयाप्रमाणात आगी लागण्याच्या दुर्घटना घडल्या असून

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल; दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा, पुढील काही दिवस हवामान कोरडे

Maharashtra Weather : नोव्हेंबर महिन्यात राज्यातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा वाढत असून,