Thane Railway Station: ठाणेकरांचा रेल्वे प्रवास होणार सोपा! फलाट 5-6 वर नवा एस्केलेटर, फलाट 2 वर मोफत स्वच्छतागृह

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 वर नवीन सरकता जिना उभारण्यात आला आहे. तसेच फलाट क्रमांक 2 वर नि: शुल्क स्वच्छतागृह प्रवाश्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. नि:शुल्क स्वच्छतागृह हे डी मार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे.

Thane Railway Station: मध्य रेल्वेचे ठाणे हे प्रमुख आणि गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. ठाण्यावरून पनवेल, सीएसएमटी, कर्जत, कसारा, बदलापूर या सारख्या स्थानकावर पोहचण्यासाठी लोकल उपलब्ध असल्याने प्रवाश्यांची गर्दी ही कायमच असते. या वाढत्या गर्दीचा विचार करता ठाणे स्थानकात प्रवाशांच्या सोयीने काही बदल करण्यात आले आहेत. त्यातीलच ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 5 आणि 6 हे सर्वात व्यस्त विभागांपैकी आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी डोंबिवली, कल्याण, कसारा, आसनगाव, बदलापूर आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांसोबतच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचीही येथे मोठी वर्दळ असते. येणारे प्रवासी आणि लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारे प्रवासी एकाच वेळी एकत्र येत असल्यामुळे, फलाटावर, विशेषतः जिन्या आणि पादचारी पुलांजवळ, ये-जा करताना अनेकदा मोठी वाहतूक कोंडी होते.



याचाच विचार करून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 वर नवीन सरकता जिना उभारण्यात आला आहे. तसेच फलाट क्रमांक 2 वर नि: शुल्क स्वच्छतागृह प्रवाश्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. नि:शुल्क स्वच्छतागृह हे डी मार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. सीएसटीच्या दिशेने पहिल्याच पादचारी पुलावर नवीन सरकता जिना उभारण्यात आलेला आहे. तर या नवीन जिन्याची मागणी ही प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती. त्याचअनुषंगाने खासदार नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाकडे सरकत्या जिन्याची मागणी केली आणि प्रशासनाकडून ही मागणी देखील पूर्ण करण्यात आली. दरम्यान, 15 डब्यांच्या गाड्यांमधून किंवा कल्याण, कर्जत आणि कसारा दिशेकडून येणाऱ्या गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांसाठी एस्केलेटरची जागा सोयीची ठरत आहे.


यात एक आणखी महत्वाची बाब म्हणजे, नवे नि:शुल्क स्वच्छतागृह हे 24 तास स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत असून पाणी , वीज, देखभालीची जबाबदारी ही मध्य रेल्वे प्रशासनाकडे असणार आहे. हा स्वच्छतागृहाचा राबवलेला उपक्रम डी मार्ट आणि मध्य रेल्वे यांनी संयुक्तरित्या मिळून केलेला आहे. डी मार्ट हे ठाणे रेल्वे स्थानकावर सर्व फलाटांवर स्वच्छतेची मोहीम राबवणार आहे.

Comments
Add Comment

Gold Rate : सोनं खरेदीची संधी की आणखी दरवाढीची प्रतीक्षा? डिसेंबरमध्ये मोठा उलटफेर शक्य!

Gold Rate : दिवाळी नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा

Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे पहिली पत्नी

Avinash Arun Second Marriage: नुकताच ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ (Prahaar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे

Mumbai Bomb Threat: मुंबई-पुण्याला बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालयासह 5 ठिकाणे रडारवर

Mumbai Bomb Threat: मुंबईसह पुण्यातदेखील बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल आला आहे. मुंबईमध्ये महापौरांच्या कार्यालयाचा

Kiara Advani News: ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सवर सिद्धार्थची प्रतिक्रिया; कियाराने केला खुलासा!

‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कियारा अडवाणी अभिनेता यशसोबत

Free Bus Service in Delhi: दिल्लीतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत मोफत बस सेवा; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Free Bus Service in Delhi: हिवाळ्याला सुरुवात झाली असून राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण आणि धुरक्याची पातळी यात वाढ झाली आहे.

O Saathi Re Web Series: इम्तियाज अली,अदिती राव यांची 'ओ साथी रे' वेब सिरीज नेटफ्लिक्सवर 'या' दिवशी प्रदर्शित

O Saathi Re Web Series: चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांची एक नवीन वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पडद्यावर