Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ‘ही’ 4 गाणी वाजणार नाहीत? बाल संरक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. परंतु लाईव्ह कॉन्सर्ट सुरु होण्याआधीच त्यावर नवीन निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून दिलजीतला कॉन्सर्टमध्ये 4 गाणी न गाण्याची विनंती केली आहे.

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. परंतु लाईव्ह कॉन्सर्ट सुरु होण्याआधीच त्यावर नवीन निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून दिलजीतला कॉन्सर्टमध्ये 4 गाणी न गाण्याची विनंती केली आहे. या गाण्यांच्या बोलांमध्ये दारू, अमली पदार्थ (नशे) आणि बंदूक संस्कृतीचे (हिंसेचे) उदात्तीकरण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गाण्यांचे बोल बदलण्यास सांगितले आहे. तसेच सध्या ती सादर करण्यास ही मनाई करण्याची मागणी केली आहे.


कोणत्या गाण्यांवर मज्जाव करण्याची मागणी करण्यात आली आहे?


• पटियाला पैग (Patiala Peg)
• 5 तारा (5 Taara Theeke)
• जेब विचो अफीम / जेब विचो फीम (Jeeb Vicho Feem)
• जट्ट फायर करदा / जट्ट उठे फायर करदा (Jatt Fire Karda)


या गाण्यांच्या गीतामध्ये दारू, अफू, अमली पदार्थ आणि शास्त्रे यांचा उल्लेख असल्याने मुलांवर आणि तरुणांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दिलजीत दोसांझच्या परफॉर्मन्समध्ये मद्यपान, नशा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच, कॉन्सर्टमध्ये लहान मुलांना स्टेजवर बोलावणे, मोठ्या आवाजातील संगीत आणि लेझर लाईट्समुळे होणाऱ्या धोक्यांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांच्या कॉन्सर्टमधील 'बंदूक आणि बुलेट बेल्ट' परिधान करण्यावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी 15 नोव्हेंबर रोजी इंदूर येथे होणाऱ्या त्यांच्या कॉन्सर्टवरही अशाच प्रकारची पाबंधी लावण्याची मागणी करण्यात आली होती.

15 नोव्हेंबर रोजी इंदूरमध्ये दिलजीतचा कार्यक्रम सादर करणार आहे. त्याआधीच शहरातील तीन बँका आणि महापौरांच्या सचिवालयाला बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्या ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. हे ईमेल पंजाबी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये लिहिलेले आहेत. तसेच धमकीच्या ईमेलमध्ये बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि इंदूर महापौर सचिवालय यांना लक्ष्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या ईमेलनंतर, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाचे एक पथक महापौर सचिवालयात दाखल झाले आणि त्यांनी परिसराची कसून तपासणी केली.

Comments
Add Comment

Maharashtra Film Tourism: महाराष्ट्रात चित्रपट पर्यटनाला मिळणार नवी झळाळी! पर्यटन विभाग आणि चित्रनगरीत 5 वर्षांचा करार

मुंबई: पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात महाराष्ट्राला चित्रपट

Family Kirana Store TVF : टीव्हीएफच्या ‘फॅमिली किराणा स्टोअर’चा नवा विक्रम; अवघ्या १० महिन्यांत यूट्यूबवर तीन सीझन प्रदर्शित

गज्जू भैयांच्या (Gajju Bhaiya) किराणा दुकानाचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होण्यासाठी सज्ज झाले आहेत! द

Moushumi Chatterjee: मौसमी चॅटर्जींवर कोसळला दु:खाचा डोंगर, ज्येष्ठ अभिनेत्रीच्या पतीचे निधन

हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

TV Serial Ramayana : रामायण मालिकेतील रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांना कशी मिळाली ? 100 कलाकारांच्या ऑडिशननंतर रामानंद सागर यांनी घेतला होता मोठा निर्णय

TV Serial Ramayana Throwback : भारतीय मनोरंजनविश्वात ‘रामायण’ या मालिकेचे स्थान आजही अढळ आहे. रामानंद सागर यांच्या या लोकप्रिय

Big Boss 20: 'कैरेक्टर ढीला..तेरी पैंट में नाड़ा नहीं', लव्ह आणि स्काऊट मध्ये जोरदार वाद; बिग बॉस मध्ये मोठा राडा

Big Boss 20: बिग बॉस 20 च्या घरात 'कैरेक्टर ढीला' या गाण्यावरून लव्ह गिल आणि स्काऊट ओपी (Scout OP) यांच्यात जोरदार वाद रंगला.

Govinda and Komal Rani Viral Photos: गोविंदासोबत कोमल राणीचे खास फोटो; राखी सावंत संतापली!

[caption id="attachment_1074657" align="alignnone" width="800"] अभिनेत्री कोमल राणीनं अभिनेता गोविंदासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.(Photo: