काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?
टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, 'आम्ही पाहिलं की, खेळपट्टीच्या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या डावात खूप मोठा फरक होता. पण हेन्रीने पहिल्या चेंडूपासूनच ज्याप्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, त्याचं श्रेय त्याला द्यायलाच हवं. मला वाटतं ते सनसनाटी होतं.' श्रेयस अय्यर शॉर्ट-बॉलच्या डावपेचांवर आणि खेळपट्टीवरील गोलंदाजीच्या आदर्श लांबीवर म्हणाला की, 'मला वाटतं, पहिल्या डावात आम्ही जवळजवळ सर्व काही करून पाहिलं, ज्याप्रकारे ते आक्रमक खेळत होते. आणि आम्हाला वाटलं की खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली होती, कारण त्यानंतर त्यांनी 330 धावा केल्या होत्या. अर्थात, दोन-चार झेल सुटले, पण सामन्यात असं नक्कीच घडतं. पण हो, जेव्हा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये गेलो, तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही सहजपणे पाठलाग करू. पण ज्याप्रकारे चेंडू आत-बाहेर वळत होता, त्यामुळे मनातल्या मनात ठरवता येत नव्हतं की मी अशाप्रकारे खेळणार आहे. किंवा तुम्ही खेळपट्ट्या पाहिल्या तरी, कोणीही सहज विकेट गमावली नाही. ते चांगले चेंडू होते.'
न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकूनही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. श्रेयस ...
कर्णधार श्रेयस अय्यर पुढील सामन्याच्या तयारीबद्दल म्हणाला की, 'अर्थातच, हा सामना विसरून गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये काय चुकले याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. पण हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की आपण दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्या सामन्यातून खूप प्रेरणा घेऊन, नव्या मानसिकतेने मैदानात उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे.'