IND vs NZ 4th ODI: भारताने 244 धावांनी सामना गमावला आणि नकोसे विक्रम केले नावावर, वाचा काय ते
न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात भारताला 244 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे भारताच्या नावावर नकोसे विक्रम रचले गेले आहे. भारताचा हा वनडे क्रिकेट इतिहासातील दुसरा मोठा पराभव आहे.
November 13, 2026 03:10 PM
1/5 न्यूझीलंडचा एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 244 धावांनी मिळवलेला विजय हा त्यांच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. 2008 मध्ये आयर्लंडविरुद्ध ॲबरडीन येथे मिळवलेला 290 धावांनी विजय मिळवला होता. (Photo: BCCI Twitter)
2/5 भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. माउंट माउंगानुई येथील 244 धावांचा पराभव हा भारतीय क्रिकेट इतिहासातील धावांच्या फरकाने झालेला दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. भारताचा सर्वात मोठा पराभव 2000 मध्ये शारजाह येथे श्रीलंकेविरुद्ध 245 धावांनी झाला होता. हा नकोसा विक्रम अवघ्या 1 धावेने वाचला. (Photo: BCCI Twitter)
3/5 न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघ अवघ्या 89 धावांवर सर्वबाद झाला. ही भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आहे. भारताचा संघ संपूर्ण वनडे इतिहासात आतापर्यंत आठ वेळा 100 धावांच्या आत बाद झाला आहे. या यादीत 2000 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शारजाह येथे केलेली 54 धावांची नीचांकी धावसंख्या आहे. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 63 (1981), श्रीलंकेविरुद्ध 78 (1986), पाकिस्तानविरुद्ध 79 (1978) आणि न्यूझीलंडविरुद्ध 88 (2010) या धावसंख्यांचा समावेश आहे. (Photo: BCCI Twitter)
4/5 भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडणाऱ्या मॅट हेन्रीने या सामन्यात 6 बळी घेतले आणि न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्यांदा आपले नाव कोरले. या कामगिरीसह त्याने दिग्गज वेगवान गोलंदाज शेन बाँडच्या 4 वेळा 5 बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक 6 वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम ट्रेंट बोल्टच्या नावावर आहे. (Photo: NZ Cricket Twitter)
5/5 भारताविरुद्ध पुन्हा एकदा पाचपेक्षा जास्त बळी घेत मॅट हेन्रीने एका खास यादीत स्थान मिळवले आहे. एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो न्यूझीलंडचा चौथा गोलंदाज ठरला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वेळा पाच बळी घेणारा शेन बाँड अव्वल स्थानावर आहे. (Photo: NZ Cricket Twitter)