Mumbai Accident News : मुंबई कोस्टल रोडवर 5 ते 6 वाहनांची धडक; महिंद्रा एसयूव्हीला आग, काही जण किरकोळ जखमी

मात्र, काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

Mumbai Accident News:  मुंबईतील कोस्टल रोडवर गुरुवारी रात्री उशिरा 5 ते 6 वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एका महिंद्रा एसयूव्हीला आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

नरिमन पॉइंट ते वरळी मार्गावर अपघात


प्राथमिक माहितीनुसार, नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गावर पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुरुवातीला दोन वाहनांची टक्कर झाली. त्यानंतर काही वाहने घटनास्थळी थांबली होती. याचवेळी भरधाव वेगाने येणारी महिंद्रा एसयूव्ही अनियंत्रित झाल्याचा आरोप आहे. या एसयूव्हीने थांबलेल्या वाहनांना मागून जोरदार धडक दिली.

या धडकेनंतर एसयूव्हीला आग लागली. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.


दारूच्या नशेत वाहन चालवले होते का? पोलिसांकडून तपास


अपघाताच्या वेळी एसयूव्ही चालक दारूच्या नशेत होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघात नेमका कसा घडला आणि त्यामागील कारण काय, याचीही चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या अपघातामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Comments
Add Comment

अंधेरीत एलपीजी सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून आगीचा भडका; आई-मुलगी गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरात एलपीजी सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून आगीचा भडका उडाल्याची घटना

हवामानात मोठा बदल! महाराष्ट्रात हाड गोठवणारी थंडी घेऊन येतेय नवीन लाट; 13 नोव्हेंबरपासून हुडहुडी भरणार!

महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्याने मोठे बदल होत असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आता थेट राज्यातील

मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे यांची 'पंचदीप बालगृहात' दिवाळी; कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेल्या वैजयंती कदमचा विशेष सत्कार!

मुंबई: महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि त्यांचे पती, नवी मुंबई शहर पोलीस सहआयुक्त दीपक

Ashish Shelar : मुंबईत 5 हजार बालके कुपोषित; ही बाब अत्यंत शरमेची! 'कुपोषणमुक्त मुंबई'साठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा

मुंबई: मुंबईत मध्यम कुपोषित बालकांची संख्या 5 हजार असून ही बाब आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत शरमेची आहे, अशी स्पष्ट

Mumbai local train incident : मुंबई लोकल प्रवासात संतापजनक घटना : विनयभंगाला विरोध केल्याने महिलेला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलले; पीडितेला हात गमवावा लागल्याने खळबळ

मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोरीवली

मुंबईत संतापजनक प्रकार! फटाके फोडण्याच्या वादातून दाम्पत्य आणि चिमुरडीवर 10 जणांचा जीवघेणा हल्ला

मुंबई: दिवाळीच्या आनंदात मग्न असलेल्या मुंबई शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.