Nashik : नाशिकमध्ये आरपीएफची मोठी कारवाई ! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये संशयित तरुणाला पकडले, बॅगेतील रोकड पाहून आरपीएफही चक्रावले

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) मोठी कारवाई केली आहे. 'ऑपरेशन सतर्क' अंतर्गत एका संशयित तरुणाकडून तब्बल 1 कोटी 48 लाख 64 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान गुरुवारी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाला रोखले. ट्रेन क्रमांक 22112 अमृत भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा हा तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर बॅग घेऊन जात असताना जवानांना त्याच्यावर संशय आला.



बॅगेत आढळली कोट्यवधींची रोकड


आरपीएफ जवानांनी तरुणाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात एकूण 1 कोटी 48 लाख 64 हजार रुपयांची रोकड आढळून आली. संबंधित तरुणाची ओळख संदीप बाळासाहेब भामरे अशी झाली आहे. तो मूळचा आटपाडी, जिल्हा सांगली येथील रहिवासी असून सध्या जळगावमधील भवानी पेठ परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.



रोकड कुठून आली? आरपीएफकडून चौकशी सुरू


इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगण्याबाबत आरपीएफ जवानांनी तरुणाकडे विचारणा केली. ही रक्कम नेमकी कुठून आणली, कोणाची आहे आणि ती कुठे नेली जात होती, याबाबत त्याच्याकडे माहिती मागण्यात आली. मात्र, रोकडीच्या स्रोताबाबत समाधानकारक स्पष्टीकरण तसेच वैध कागदपत्रे सादर करण्यात तरुणाला अपयश आले.


यानंतर आरपीएफ जवानांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. या कोट्यवधींच्या रोकडमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास केला जात आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून विशेष दक्षता घेतली जात असतानाच ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Comments
Add Comment

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! आता सोमवारी 'या' भागांत 24 तास नळ कोरडे राहणार; वाचा संपूर्ण यादी

ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. संभाव्य दुष्काळसदृश

Nashik : धमकीच्या ई-मेलनंतर काळाराम मंदिराचा दक्षिण दरवाजा बंद, पंचवटीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नाशिक : पंचवटी येथील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर देवस्थानला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर मंदिर प्रशासन आणि

Akshaya Navami 2026: 18 नोव्हेंबर की 19 नोव्हेंबर यावर्षी आवळा नवमी नेमकी कधी?

Akshaya Navami 2026:  कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाचा नववा दिवस अक्षय नवमी म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला आवळा नवमी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दोन

Chhagan Bhujbal : अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलिनीकरणाबाबत माझ्यासमोरच चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आला असताना, यापूर्वीही या

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने 15 वाहनांना उडवले, सुदैवाने जीवित हानी नाही

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी