15 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता शाह भारत फोर्ज लिमिटेडच्या मुंढवा औद्योगिक परिसरातील कॅम्पसला भेट देतील. त्यानंतर दुपारी 3.15 वाजता तळेगाव दाभाडे येथील एनएचईसी प्रकल्पात बहुराज्य सहकारी संस्थेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहतील. याच कार्यक्रमात केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेचा औपचारिक प्रारंभही यावेळी होईल.
बेंगळुरू : ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक एच. व्ही. शेषाद्री (H. V. Sheshadri) यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या उभारणीसाठी वेचले. देशाला पुढे न्यायचे असेल तर ...
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता शाह पुणे येथील भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला आणि शांतिलाल मुथा फाउंडेशनच्या मुख्यालयाला भेट देतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषद कार्यालयातील यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12 वाजता भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ‘मराठा इतिहास - डिजिटल अभिलेखागार’चे लोकार्पण करण्यात येणार आहे.