आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा; तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही

आता आधार कार्डवर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आधार केंद्रांवर तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही घरबसल्या अगदी 5 मिनिटांत मोबाईल नंबर बदलू शकता. यासाठी अवघे 75 रुपये शुल्क आकारले जाते.

1/6 आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी अनेकदा लोकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते आणि लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागते. परंतु, तुम्ही हेच काम आता अवघ्या काही मिनिटामध्ये करू शकणार आहेत. मोबाईल ॲपच्या मदतीने तुम्ही घरबसल्याच आधार कार्डवरील मोबाईल नंबर अपडेट करू शकणार आहेत.

2/6 अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी अधिकृत आधार ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करून कोणीही सहज वापरू शकतो. पूर्वी लोकांना आधार सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत असे, परंतु आता या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचत आहे.

3/6 सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये आधार ॲप इन्स्टॉल करून आपल्या आधार कार्डच्या तपशीलांच्या मदतीने लॉगिन करा ॲप लॉग ईन करा. ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर खालील बाजूला 'सर्व्हिस' (Service) पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

4/6 सर्व्हिसच्या आत तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर संपूर्ण प्रक्रिया, पायऱ्या आणि सर्वात खाली 'कंटिन्यू टू अपडेट मोबाईल नंबर' असा पर्याय येईल.

5/6 या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला जेमतेम 5 मिनिटांचा वेळ लागेल. युजर्सला ओटीपीच्या माध्यमातून आपला मोबाईल नंबर पडताळवावा लागतो. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागते. शेवटी तुम्हाला ऑनलाइन 75 रुपयांची फी भरावी लागेल.

6/6 पेमेंट यशस्वी झाल्यानंतर साधारण 15 दिवसांच्या प्रोसेसिंग टाईममध्ये तुमच्या आधार कार्डवर नवीन मोबाईल नंबर अपडेट होऊन जातो. आता हे सर्व काम तुम्ही कोणताही त्रास न होता, घरबसल्या आपल्या मोबाईलवरून करू शकता.
Comments
Add Comment

Delhi Red Fort bomb blast : 'स्फोटाशी आमचा संबंध नाही'; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचा न्यायालयात दावा!

लाल किल्ला स्फोट प्रकरणात अटक केलेल्या आरोपींवरील आरोप निश्चितीसंदर्भात दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू

Cute Panda Viral Video : मुलीचा तोल गेला अन् थेट पांडाच्या पिंजऱ्यात कोसळली! पुढे जे घडले ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल...

सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात, तर

Gurugram couple car chase news : 'दिवाळीची रात्र ठरली जीवघेणी...' गुरुग्राममध्ये जोडप्याच्या कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग; थेट घराच्या गेटपर्यंत आला संशयितांचा जमाव अन् पुढे...

गुरुग्राम : देशातील 'मिलेनियम सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि चकचकीत रोषणाईने नटलेल्या गुरुग्राम शहरातील

Sheikh Hasina Extradition: शेख हसीनांना परत नेण्यासाठी भारताची अट; बांगलादेशला काय करावं लागणार?

भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी दोन अटी ठेवल्या आहेत.

Yogi Adityanath speech on terrorism: 'मोदी सरकारने दहशतवादी हल्ले करणाऱ्यांची मस्ती जिरवली'; माजी सैनिकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा घणाघात

मेरठ: क्रांतीची भूमी असलेल्या मेरठमध्ये आयोजित 'माजी सैनिक पुनर्मिलन सोहळ्यात' उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी

महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप घोटाळाच्या CBI- ED च्या कारवाईत धक्कादायक खुलासे; घोटाळ्याची रक्कम 92,000 कोटींवर!

मुंबई: 'महादेव ऑनलाइन बुक' बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) देशभरातली सहा राज्यांत