Friday, November 13, 2026

IND vs PAK U19 Asia Cup Final Live Score: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान महामुकाबला; वाचा सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट

ACC पुरुष 19 वर्षांखालील आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. ओमानमधील अल अमिरात मैदानावर रंगणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्याची नाणेफेक, प्लेइंग 11, लाईव्ह स्कोअर आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स येथे वाचा.

एसीसी पुरुष 19 वर्षांखालील आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. ओमानमधील अल अमिरात क्रिकेट ग्राउंडवर हा महामुकाबला रंगणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेक सकाळी 10 वाजता होणार आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून एकतर्फी पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशवर 9गडी राखून मात करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या साखळी फेरीत पाकिस्तानने भारताचा 3 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून त्या पराभवाची परतफेड करण्याची आणि आशिया चषकावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी कर्णधार लक्ष्य रायचंदानीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे आहे.
LIVE UPDATES

IND vs PAK U19 Asia Cup Final Live Update पाकिस्तान U19 संघ :

उस्मान खान, हयाम खान, अब्दुल कादिर, फरहान युसूफ (कर्णधार), अहमद हुसेन, अली रझा, हमजा जहूर (विकेटकीपर), हसनैन अब्बास दार, मोहम्मद सय्यम, रिजवानुल्ला, निकाब शफीक, जहांगीर बिलाल, हुजैफा अहसान, मोहम्मद हुजैफा, अब्दुल सुभान.

ND vs PAK U19 Asia Cup Final Live Update भारत U19 संघ :

लक्ष्य राजेश रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही. के. विनीथ, यशवर्धन चौहान, अर्जुन राजपूत, अन्वय द्रविड (विकेटकीपर), मनाल चौहान, मोहित उलवा, आर्यन सवसानी, काव्या पटेल, इशान सूद, कुशाग्र ओझा, रजत बघेल, शविन विनोद, यशवीर गौड.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >