व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत चौघांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुंबई पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये, एका अल्पवयीन मुलीसोबत व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत चौघांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. घडलेल्या प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबई: मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनुसार, एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आधी मैत्रीच्या जाळ्यात ओढून नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. इतकंच नाही तर, आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एफआयआरनुसार, या प्रकरणात कृष्णा, कासिम, सोहेल आणि अयान अशा चार आरोपींचा उल्लेख आहे. आरोपींच्या मोबाईल फोनमधून धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत. मोबाईलमधून 20 हून अधिक अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ सापडल्याने मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे.






पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंदवलेल्या पीडितेच्या जबाबानुसार, 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी कृष्णा नावाच्या तरूणासोबत ऑगस्ट 2026 मध्ये भेट झाली होती. त्यानंतर, तिची अयान आणि कासिम या दोन तरुणांशी तिची ओळख झाली. तेव्हापासून ती त्यांच्यासोबतही बोलू लागली. आरोपी आणि त्याच्या दोन्हीही मित्रांसोबत ओळख झाल्यानंतर ते रोज बोलायचे. रोज बोलत असल्यामुळे त्यांनी एक दिवशी भेटण्याचं ठरवलं. तक्रारीनुसार, 6 नोव्हेंबर 2026 रोजी, दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास, पीडित तिच्या ओळखीच्या एका मुलीला भेटायला जात होती. याच दरम्यान, ती आरोपीला भेटली. असा आरोप आहे की, तिला कोणत्यातरी बहाण्याने कांदिवली पूर्वेतील हनुमान नगरमधील एका रिकाम्या खोलीत नेण्यात आले. एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.






यावेळी त्या तरूणांनी तिच्या अश्लील व्हिडिओ बनवण्याचाही प्रयत्न केला. त्या व्हिडिओ अल्पवयीन मुलीने डिलिट करण्याची मागणी सुद्धा तिने केली. परंतू त्या तरूणांनी तिची तिला तुझा व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी सुद्धा त्यांनी तिला दिली. तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, चार दिवसांनंतर पीडितेला सोहेल नावाच्या तरूणाने 10 नोव्हेंबर 2026 रोजी, अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावर एक मेसेज पाठवून तिला त्याच्या घरी भेटण्यासाठी बोलवले. जेव्हा पीडितेने त्याला भेटण्यासाठी नकार दिला, तेव्हा तिच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने तिला दिली. पीडितेने या घटनेबद्दल तिच्या आईला सांगितले आणि त्यानंतर कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधला. कांदिवलीच्या समतानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे.






समतानगर पोलिस स्थानकामध्ये चारही आरोपींविरोधात, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा, 2012 च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आणि चारही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. 17 वर्षांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना डोंगरी येथील निरीक्षण गृहात पाठवण्यात आले. 18 आणि 22 वर्षे वयाच्या इतर दोन आरोपींना दिंडोशी येथील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 16 नोव्हेंबरपर्यंत सोमवारपर्यंत, पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

थिएटरमध्ये तुफान कमाई केल्यानंतर 'हनुमान अंश' OTT वर रिलीज होणार, कुठे होणार रिलीज; जाणून घ्या तारीख

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित, 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. 2

Mumbai Fire: परळच्या कामगार स्टेडियममध्ये भीषण आग, लाकूड आणि बांबूच्या साहित्याला आग; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबईतील दादर पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील प्रसिद्ध कामगार स्टेडियममध्ये रविवारी

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

मुंबई: महाराष्ट्र सरकारने जनतेला उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन

मुंबई: राज्यात फळबागा असलेल्या एकूण 6 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे 2.5 लाख

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न