अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या भारतीय तरुणाला 30 वर्षांची शिक्षा, अल्पवयीन सांगून करायचा ब्लॅकमेल

ब्रिटनमध्ये सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून अल्पवयीन मुलींची फसवणूक आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या 27 वर्षीय बिलाल काझी या तरूणाला ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ब्रिटन: ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या 27 वर्षीय भारतीय वंशाच्या बिलाल काझी या तरूणाला अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढून त्यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा सुनाववण्यात आली आहे. बिलाल काझी या तरूणाने अल्पवयीन मुलींसोबत, संवाद साधताना 14 वर्षांचा ब्रिटिश मुलगा असल्याचे भासवत, सोशल मीडियावरील मुलींसोबत त्याने फ्रेंडशिप केली. तब्बल 70 अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढत या तरूणाने त्यांचं शोषण केलं आहे. सोशल मीडियावर मुलींसोबत फ्रेंडशिप करत, त्यानंतर, प्रेमाचे नाटक करून तो त्यांच्याकडून खाजगी फोटो आणि व्हिडिओंची मागणी करायचा. जर एखाद्या मुलीने नकार दिला, तर तो ते फोटो कुटुंबीय आणि मित्रांना पाठवण्याची धमकी देत ​​असे.






चेस्टर विद्यापीठात शिकणाऱ्या काझीने 37 गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्यावर अल्पवयीन मुलींचे अश्लील फोटो तयार करणे, त्यांना ब्लॅकमेल करणे आणि अल्पवयीन मुलींना लैंगिक कृत्यांसाठी प्रवृत्त करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. क्राऊन कोर्टामध्ये बिलाल काझीवर संबंधित आरोपांवर सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलालने ऑगस्ट 2021 ते ऑगस्ट 2025 या काळात मुलींना लक्ष्य केले.


त्याने स्नॅपचॅट, रोब्लॉक्स आणि विंक यांसारख्या सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर 'रीस' या नावाने फेक अकाऊंट बनावायचा. अल्पवयीन मुलींसोबत, संवाद साधताना काझी स्वत:ला 14 वर्षांचा ब्रिटिश मुलगा असल्याचे भासवायचा. अल्पवयीन मुला-मुलींसोबत संवाद साधतना तो अकाऊंटसाठी ब्रिटिश तरूण- तरूणींचे फोटो वापरून त्यांच्यासोबत संवाद साधायचा.


सोशल मीडियावर मुलींसोबत फ्रेंडशिप करत, त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करून तो त्यांच्याकडून खाजगी फोटो आणि व्हिडिओंची मागणी करायचा. जर एखाद्या मुलीने नकार दिला, तर तो ते फोटो कुटुंबीयांना किंवा मित्रांना पाठवण्याची धमकी द्यायचा. काही प्रकरणांमध्ये, त्याने अल्पवयीन मुलींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून ते फोटो आपल्या मित्रांना सुद्धा पाठवले होते. त्याने स्नॅपचॅटद्वारे काही व्हिडिओदेखील गुपचूप रेकॉर्ड केल्याचे स्पष्ट झाले आहे.






एका 13 वर्षांच्या मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर नोव्हेंबर 2021 पासून या प्रकरणाचा तपास सुरू झाला. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपचॅटवर तिची एका बिलाल काझीसोबत ओळख झाली, ते दोघंही एकाच वयोगटातील असल्याचं तिला वाटलं. त्यांच्या संभाषणादरम्यान, बिलालने तिच्याकडे काही खाजगी फोटोंची मागणी केली. त्याने त्यासाठी त्याला नकार दिला, तेव्हा त्याने तिला शिवीगाळ केली आणि ती त्याची मालमत्ता असल्याचे सांगितले. तिने पूर्वी पाठवलेले फोटो त्याच्या मित्रांना पाठवण्याची धमकी त्याने दिली. भीतीपोटी, त्या मुलीने त्याच्या मागण्या मान्य केल्या. नंतर, बिलालने तिचे स्नॅपचॅट अकाऊंट हॅक केले आणि ते फोटो तिच्या मित्रांना पाठवले. तपासादरम्यान, पोलिसांनी बिलालच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या युझरनेम आणि इतर माहितीच्या आधारे 180 पीडितांची ओळख पटवली.






यांपैकी, 11 ते 17 वयोगटातील 70 मुलींची ओळख पटवण्यामध्ये पोलिसांना यश मिळालं आहे. या मुली ब्रिटनच्या 45 पोलीस कार्यक्षेत्रांपैकी 28 कार्यक्षेत्रांमध्ये राहत होत्या. पोलिसांनी 21 जुलै 2023 रोजी हिथ्रो विमानतळावर बिलालला अटक केली होती. तो यापूर्वी युके सोडून गेला होता आणि परत आल्यावर त्याला पकडण्यात आले. 13 नोव्हेंबर रोजी शिक्षा सुनावताना न्यायाधीश स्टीफन एव्हरेट यांनी सांगितले की, बिलालने अल्पवयीन मुलांना टार्गेट करण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर केला. त्याने त्यांच्या स्वतःच्या घरातही त्यांची सुरक्षिततेची भावना कमी केली. न्यायाधीशांकडून त्याची एक 'अत्यंत धोकादायक व्यक्ती' अशी ओळख करून देण्यात आली. बिलालला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. किमान 20 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतरच त्याची जामिनावर सुटका करण्यात येणार आहे. त्याला आयुष्यभर लैंगिक गुन्हेगारांच्या नोंदणीत राहावे लागेल. तुरुंगातून सुटल्यानंतर, तो आठ वर्षांसाठी देखरेखेखाली आणि कायदेशीर निर्बंधांच्या अधीन राहील.

Comments
Add Comment

Sheikh Hasina Extradition: शेख हसीनांना परत नेण्यासाठी भारताची अट; बांगलादेशला काय करावं लागणार?

भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी दोन अटी ठेवल्या आहेत.

Microsoft Outage मुळे किती नुकसान? एका दिवसात किती कमावते ही कंपनी?

मायक्रोसॉफ्टच्या सेवेत आलेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील व्यवसाय आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज

थरकाप उडवणारी घटना! नेपाळमधील गोरख्यात कोसळली महाकाय दरड; बूढी गंडकी नदीचा प्रवाह रोखला जाणार का?

काठमांडू : शेजारील देश नेपाळमधून एक मोठी आणि चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात

आसाममधील काझीरंगा अपघातातील मृतांचा आकडा 26 वर; 23 जणांची ओळख पटली, देशभरात हळहळ

दिसपूर : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढून 26 वर

ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर; चीनमध्ये ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक

वॉशिंग्टन : जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेसकडून सौदी अरेबियाच्या उड्डाणांवरील निर्बंध वाढवले; रियाध-दम्माम सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद

मुंबई : मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन टाटा समूहाच्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान