
नवी दिल्ली : भारत आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने भारतीय लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ 16 ते 19 नोव्हेंबर 2026 या कालावधीत चेक प्रजासत्ताकाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करणे, संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधी शोधण्यावर भर दिला जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान जनरल धीरज सेठ प्राग येथील जनरल स्टाफ मुख्यालयात चेक सशस्त्र दलांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, जनरल स्टाफ प्रमुख लेफ्टनंट जनरल पेट्र चेपेलका आणि संरक्षण उपप्रमुख यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य, प्रशिक्षण, सैन्याचे आधुनिकीकरण आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हाने यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. याशिवाय, जनरल धीरज सेठ चेक लष्कराच्या शहीद जवानांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहणार आहेत. तसेच चेक प्रजासत्ताकच्या संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही ते भेट घेणार आहेत.
लखनौ : उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. स्वामी विवेकानंद युवा सक्षमीकरण योजनेच्या दुसऱ्या ...
संरक्षण तंत्रज्ञानातील सहकार्यावर विशेष भर
या दौऱ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून लष्करप्रमुख ब्रनो येथील संरक्षण विद्यापीठाला भेट देणार आहेत. तसेच नाटोच्या संयुक्त रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक संरक्षण उत्कृष्टता केंद्रालाही भेट देऊन चेक सशस्त्र दलांचे विशेष प्रशिक्षण, परिचालन क्षमता आणि भविष्यातील संरक्षण सज्जतेची माहिती घेणार आहेत. संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी जनरल धीरज सेठ AMOS, संरक्षण आणि सुरक्षा उद्योग संघटना तसेच प्रमुख संरक्षण उत्पादकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या चर्चेत संरक्षण तंत्रज्ञान, आधुनिक लष्करी उपकरणे आणि औद्योगिक भागीदारीच्या संधींचा आढावा घेतला जाणार आहे. भारत आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील दीर्घकालीन लष्करी संवाद, व्यावसायिक देवाणघेवाण आणि औद्योगिक सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.





