49 वर्ष उलटली तरीही सचिन तेंडुलकरने जपून ठेवली 'ती' एक गोष्ट! फोटो शेअर करत फॅन्सला केलं थकित

Sachin Tendulkar News: क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडूलकरने त्याचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. त्याच्या ह्या 49 वर्षे जुन्या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्या जुन्या फोटोतील हुबेहुह नक्कल सचिनने करत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. जरीही सचिन क्रिकेटपासून लांब गेला असला तरीही, क्रिकेट सचिनपासून कधीही लांब गेलेला नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या फोटोने चाहत्यांचे मने जिंकली आहेत.

मुंबई: 'मास्टर ब्लास्टर' आणि 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. क्रिकेट फॅन्समध्ये पुन्हा एकदा त्याच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. भारतीय क्रिकेटसाठी आणि सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस अर्थात 15 नोव्हेंबर हा दिवस अत्यंत खास आहे. आजच्या दिवशी सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वामध्ये पदार्पण करून 37 वर्षे झाली आहेत. सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची 37 वर्षे सेलिब्रेट करताना दिसत आहे. सचिनने त्याच्या बालपणीचा एका अतिशय प्रसिद्ध फोटोचे हुबेहूब रिक्रिएशन केलेले पाहायला मिळत आहे. ह्या फोटोची सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींमध्ये एकच चर्चा रंगली आहे.






जेव्हा जेव्हा सचिनच्या महान क्रिकेट प्रवासाचा विषय समोर येतो, त्यावेळी त्याच्या बालपणीचे अनेक किस्से आपल्या समोर येतात. सचिनने एक्सवर त्याचे दोन फोटोज् शेअर केले आहेत. त्यापैकी त्याचा एक फोटो बालपणीचा आहे आणि दुसरा फोटो त्याचा सध्याचा आहे. बालपणीची सेम टू सेम आयकॉनिक पोज देत, सचिनने फोटो शेअर केले आहेत. "पहले बॅट की बात है... 49 साल बाद भी मेरे साथ है" असं कॅप्शन देत सचिनने एक्सवर फोटोवर शेअर केले आहे. दोन्हीही फोटोंमध्ये सचिनच्या हातात त्याची एकच बॅट पाहायला मिळत आहे. त्याची ती बालपणीची बॅट पाहायला मिळत आहे. सचिनने बालपणी सुद्धा आणि आता सुद्धा तिच बॅट हातात घेत फोटो शेअर केलेला आहे.


 


15 नोव्हेंबर 1989 साली वयाच्या 16 व्या सचिन तेंडुलकरने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचच्या दरम्यान, कराचीतील मैदानामध्ये सचिनने पहिली कसोटी सामना खेळला. या सामन्यामध्ये सचिनने 15 धावा केल्या होत्या. 15 धावांमध्येच तो बाद झाला. कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण करण्यासाठी सचिनला एक वर्षे लागला. ऑगस्ट 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटीमध्ये सचिनने 119 धावांची नाबाद खेळी केली. आपल्या प्रदीर्घ कारकि‍र्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करत सचिनने इतिहास घडवला.






दरम्यान, सचिन तेंडुलकर त्याच्या क्रिकेट कारकिर्दित, सर्वात परिपूर्ण फलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहिला आहे. त्याने आपल्या 22 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. 34,357 धावांसह क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च स्थानी आपले स्थान कायम ठेवले आहे. त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा आणि 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. 2011 च्या विश्वचषक विजयातही त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

Comments
Add Comment

India vs New Zealand: टीम इंडियाचा थरारक विजय! न्यूझीलंडला 22 धावांनी नमवत वनडे मालिका जिंकली

भारत : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवट अत्यंत रोमांचक झाला आहे. मालिकेतील

पाकिस्तानी फॅन्सही ओरडले 'सेहवाग-सेहवाग'! 338 धावांचा थरारक पाठलाग आणि आर्यवीरचा वडिलांना भावनिक व्हिडीओ कॉल, पहा काय घडलं!

Aryavir Sehwag Viral Video : अंडर 19 आशिया कपच्या थरारक अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानचा पराभव करत ऐतिहासिक जेतेपद

IND vs NZ 5th ODI : फिल्डिंगचा बादशाह विराट कोहलीकडून मोठी चूक; सोपा झेल सोडताच गौतम गंभीर संतापला...

Virat Kohli dropped catch : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पाचव्या आणि अत्यंत निर्णायक

Lalit Modi British Citizenship: आयपीएलचे संस्थापक ललित मोदी झाले ब्रिटिश नागरिक, ऑक्सफर्ड युनियनमध्ये केली घोषणा

इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी

जमिनीवर बसून मटणाचे जेवण, सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान यांचा साधा अंदाज व्हायरल

मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेदरम्यान मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याचा सहकारी

IND vs NZ, 5th ODI : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली! रोहित-विराट फ्लॉप, 2013 नंतर पुन्हा तेच घडलं

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. भारतीय संघाचा