Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने दिली कथकची लेखी परीक्षा; प्राजक्ता माळीच्या भन्नाट कमेंटने वेधलं लक्ष!

दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढत अमृताने एक खास परीक्षा दिली आहे. सर्वसामान्य लोकांसारखं वर्गात बसून अमृताने ही परीक्षा दिली आहे. अमृताने कथक या नृत्य प्रकाराच्या संबंधित ही परीक्षा दिली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने भन्नाट कमेंट केली आहे.

Amruta Khanvilkar Viral Video: 'वाजले की बारा' फेम मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजपर्यंत आपण तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करताना पाहिलं आहे. अभिनय, सौंदर्य याव्यतिरिक्त ही अभिनेत्री आपल्या नृत्यासाठीही ओळखली जाते. तिची अदाकारी नृत्यातून दिसून येते. अलीकडच्या काळात अमृताने बॉलिवूडमध्येही स्वतःचं नाव कमावलं आहे. तिचा स्वतःच साडीचा ब्रँड देखील आहे. अमृता खानविलकर सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढत अमृताने एक खास परीक्षा दिली आहे. सर्वसामान्य लोकांसारखं वर्गात बसून अमृताने ही परीक्षा दिली आहे. अमृताने कथक या नृत्य प्रकाराच्या संबंधित ही परीक्षा दिली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने भन्नाट कमेंट केली आहे.






अमृता खानविलकरची पोस्ट


स्वतःचा अभिमान वाटणारा आणखी एक दिवस. कथकसाठी माझी लेखी परीक्षा. हा प्रवास पूर्णपणे वैयक्तिक आणि माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. काही वर्षांपूर्वी मी स्वतःला वचन दिले होते की, केवळ माझ्या आनंदासाठी मी या मार्गावर चालेल. कोणतीही घाई नाही, कोणतीही अट नाही; फक्त एकेक पाऊल पुढे टाकत राहायचे...आणि आज, इतर विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसून, हातात हॉल तिकीट आणि रोल नंबर घेऊन, खिडकीजवळच्या जागेत बसून, प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिताना. खूपच छान वाटले! या प्रवासात नेहमी माझा हात धरून सोबत राहिल्याबद्दल @prirasha, तुझे खूप खूप आभार!


अमृताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांनी पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या सर्व कमेंट्समध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भन्नाट कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.



प्राजक्ता माळीची कमेंट


प्राजक्ताने, 'ohh MY MY... Welcome to the league, कसा गेला पेपर'? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अमृतानेही कमेंट करुन उत्तर दिलं. 'मस्त गेला पेपर', असा रिप्लाय दिला.

Comments
Add Comment

Sharad Kapoor : शरद कपूरच्या मदतीला धावला सोनू सूद; दिली चित्रपटाची ऑफर आणि वैद्यकीय मदत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शरद कपूर याचा चित्रपटसृष्टीला काम आणि आर्थिक मदत देण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल

Janak Marathi Movie: सायली संजीवचा 'जनक' चित्रपट रखडला! प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; काय आहे कारण?

Janak Marathi Movie: अभिनेत्री सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला 'जनक' हा चित्रपट 13 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार होता. हा

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेरील गोळीबाराचा कट पोलिसानांनी उधळला; दोघांना अटक

Amitabh Bachchan News: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील 'जलसा' या निवासस्थानाबाहेर गोळीबार

Ramayana : बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’चा धुमाकूळ ! जगभरात 1,379 कोटींची कमाई, ‘धुरंधर’लाही टाकले मागे

मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी,

राज्य शासनाकडून सिनेरसिकांसाठी मराठी चित्रपटांची मेजवाणी, ‘चित्रपताका– 2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित

'पंचायत'च्या पाचव्या सीझनच्या रिलीजबद्दल मेकर्सकडून महत्त्वाची अपडेट; म्हणाले, "सीरीजचा आगामी सीझन यावर्षी..."

मुंबई: ओटीटीप्रेमी गेल्या अनेक वर्षभरापासून 'पंचायत' वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते,