आशिष शेलारही झाले ‘आदि अनंत’चे चाहते! कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

आजोबा-नातवाच्या नात्यातील भावविश्व उलगडणारा आणि नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे, भावनिक मांडणीचे आणि हृदयस्पर्शी कथेचे प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि समीक्षकांकडून कौतुक केले जात आहे. यातच आता महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही हा चित्रपट पाहून त्याचे भरभरून कौतुक केले आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याचे आवाहनही केले आहे.

Aadi Anant Marathi Movie: आजोबा-नातवाच्या नात्यातील भावविश्व उलगडणारा आणि नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे, भावनिक मांडणीचे आणि हृदयस्पर्शी कथेचे प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि समीक्षकांकडून कौतुक केले जात आहे. यातच आता महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही हा चित्रपट पाहून त्याचे भरभरून कौतुक केले आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याचे आवाहनही केले आहे.


सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘चित्रपताका-2026’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा रविवारी, 15 नोव्हेंबरला दिमाखात संपन्न झाला. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.







आशिष शेलार काय म्हणाले?


‘आदि अनंत’ पाहिल्यानंतर चित्रपटाच्या आशयाचे, कलाकारांच्या अभिनयाचे आणि दिग्दर्शकीय मांडणीचे विशेष कौतुक करण्यात आले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबाला आणि नात्यांना वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या कुटुंबीयांसोबत अनुभवावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कौतुकामुळे चित्रपटाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


तसेच याआधीही प्रेक्षक, समीक्षक आणि मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांकडून ‘आदि अनंत’चे कौतुक केले जात होते. आता आशिष शेलार यांच्याकडून मिळालेली ही विशेष दाद चित्रपटाच्या भावनिक आशयाला मिळालेली एक महत्त्वपूर्ण पोचपावती ठरत आहे. आजोबा आणि नातवाच्या नात्यातील प्रेम, मस्ती, मतभेद, आठवणी आणि एकमेकांप्रती असलेली ओढ या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहेत. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या अभिनयाचेही विशेष कौतुक होत आहे.



दिग्दर्शक महेश लिमये काय म्हणाले?


“आशिष शेलार यांच्यासारख्या मान्यवरांनी ‘आदि अनंत’ पाहून चित्रपटाचे इतक्या मनापासून कौतुक करणे, ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यांनी चित्रपटाचा आशय समजून घेतला आणि प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट पाहावा, असे आवाहन केले, ही आमच्यासाठी विशेष समाधानाची गोष्ट आहे. हा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे."

Comments
Add Comment

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने दिली कथकची लेखी परीक्षा; प्राजक्ता माळीच्या भन्नाट कमेंटने वेधलं लक्ष!

Amruta Khanvilkar Viral Video: 'वाजले की बारा' फेम मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजपर्यंत आपण तिला

Sharad Kapoor : शरद कपूरच्या मदतीला धावला सोनू सूद; दिली चित्रपटाची ऑफर आणि वैद्यकीय मदत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शरद कपूर याचा चित्रपटसृष्टीला काम आणि आर्थिक मदत देण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल

Janak Marathi Movie: सायली संजीवचा 'जनक' चित्रपट रखडला! प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; काय आहे कारण?

Janak Marathi Movie: अभिनेत्री सायली संजीवची मुख्य भूमिका असलेला 'जनक' हा चित्रपट 13 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार होता. हा

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेरील गोळीबाराचा कट पोलिसानांनी उधळला; दोघांना अटक

Amitabh Bachchan News: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील 'जलसा' या निवासस्थानाबाहेर गोळीबार

Ramayana : बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’चा धुमाकूळ ! जगभरात 1,379 कोटींची कमाई, ‘धुरंधर’लाही टाकले मागे

मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी,

राज्य शासनाकडून सिनेरसिकांसाठी मराठी चित्रपटांची मेजवाणी, ‘चित्रपताका– 2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित