भाजपकडून राघव चड्ढांना मोठी जबाबदारी; पंजाब निवडणुकीच्या जाहीरनामा समितीत नियुक्ती

2027 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली असून राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांची पक्षाच्या जाहीरनामा समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत ‘आप’मधून भाजपमध्ये आलेल्या अन्य खासदारांनाही जाहीरनामा आणि आरोपपत्र समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यावर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पंजाब भाजपच्या जाहीरनामा समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत 'आप' सोडलेल्या इतर पाच राज्यसभा खासदारांना पक्षाच्या जाहीरनामा आणि आरोपपत्र समित्यांवर स्थान देण्यात आले आहे. पक्षाच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पंजाब भाजपचे अध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांनी दोन राज्यस्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखी समित्यांची घोषणा केली जाईल, असे ढिल्लन म्हणाले.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार अविनाश राय खन्ना जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असतील. मनप्रीत सिंग बादल, अश्वनी शर्मा, मनोरंजन कालिया, सोम प्रकाश, राणा गुरमित सिंग सोधी, अश्वनी सेखरी, सतनाम सिंग संधू, राघव चड्ढा, राजिंदर गुप्ता, हरभजन सिंग, परमपाल कौर आणि एचएस फुलका हे त्याचे अन्य १२ सदस्य आहेत.






राज्य युनिटचे प्रमुख म्हणून केवल ढिल्लन यांचे पूर्ववर्ती माजी खासदार सुनील जाखड आरोपपत्र समितीचे अध्यक्ष असतील. इकबाल सिंग लालपुरा, विजय सांपला, श्वेत मलिक, प्रणित कौर, रवनीत सिंग बिट्टू, दिनेश बब्बू, सुशील रिंकू, गेज्जा राम, विक्रमजीत सिंग साहनी, अशोक मित्तल, संदीप पाठक, एसएस चन्नी आणि जगमीत सिंग ब्रार हे त्याचे अन्य १३ सदस्य आहेत. राघव चड्ढा, उद्योगपती राजिंदर गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग हे जाहीरनामा समितीवर आहेत. तर संदीप पाठक आणि उद्योगपती अशोक मित्तल व विक्रमजीत सिंग सहानी हे आरोपपत्र समितीवर आहेत. ही समिती पंजाबमध्ये भाजपाची बाजू मांडण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

केंद्र सरकारच्या सेवेत नोकरीची संधी! यूपीएससीमार्फत 'गट अ'च्या 13 पदांसाठी भरती; 4 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये थेट भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध

Election 2027: पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला निवडणुकांचा धुरळा! उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यात होणार मतदान

वर्ष 2027 हे निवडणुकांचं वर्ष असणार आहे. कारण या वर्षात सात राज्यात निवडणुका होणार आहे. पण वर्षाच्या सुरूवातीला पाच

Breaking: कुलगाम येथे झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी लतीफ भट आणि त्याचा एक साथीदार ठार

याच जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Delhi showroom incident : शोरूममधील त्या घटनेने संपूर्ण दिल्ली हादरली! सीसीटीव्हीमध्ये कैद झाले धक्कादायक वास्तव!

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील मोतीनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टागणारी घटना समोर आली आहे. एका

Gold Rate Today: सोन्याचे दर आणखी कोसळणार? 1 लाखांचा टप्पा गाठणार?

सोन्या-चांदीच्या दरात होणाऱ्या चढ-उतारांकडे सध्या ग्राहकांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान

UP Election 2027: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू, मथुरेच्या बैठकीत पुढची रणनिती ठरणार

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पुढच्या वर्षी अर्थात 2027 च्या