Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

अशा अकाऊंटच्या माध्यमातून नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जाण्याची किंवा त्यांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने संबंधित अकाऊंटधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट असल्याचे भासवून Instagram वर बनावट अकाऊंट तयार करण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिक शहर सायबर पोलिसांनी संबंधित अकाऊंटधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरून कुंभमेळ्याची माहिती घेताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.



सायबर पेट्रोलिंगदरम्यान बनावट अकाऊंटचा पर्दाफाश


नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याचे पथक सोशल मीडियावरील संशयास्पद हालचालींवर नियमित लक्ष ठेवत आहे. 15 नोव्हेंबर रोजी सायबर पेट्रोलिंग सुरू असताना Instagram वर 'official.kumbhnagari_nashik' या नावाने एक अकाऊंट पोलिसांच्या निदर्शनास आले. या अकाऊंटची तपासणी केली असता, त्यावर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विविध कार्यक्रमांचे रील्स आणि पोस्ट शेअर केल्या जात असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, हे अकाऊंट 'सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक' या शासकीय कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज असल्याचे भासवण्यात आले होते.



नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता


शासकीय प्राधिकरणाच्या नावाचा वापर करून बनावट अकाऊंट चालवले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. अशा अकाऊंटच्या माध्यमातून नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जाण्याची किंवा त्यांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने संबंधित अकाऊंटधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






पोलिसांकडून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन


आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच इतर शासकीय योजना आणि कार्यक्रमांची माहिती मिळवताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून आणि प्रमाणित सोशल मीडिया अकाऊंटवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. Instagram, Facebook किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शासकीय कार्यालयांच्या नावाने बनावट अकाऊंट आढळल्यास नागरिकांनी त्याची तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.



बनावट अकाऊंट आढळल्यास येथे संपर्क साधा


नाशिक शहर सायबर पोलिसांनी नागरिकांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.


- सायबर पोलीस संपर्क क्रमांक : 9923323311


- सीपी व्हॉट्सॲप क्रमांक : 112


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग येत असताना सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून नागरिकांची दिशाभूल करण्याचे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद अकाऊंटवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची अधिकृतता तपासणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Mumbai Crime News : अभिनेत्रीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी एकाला अटक; वांद्रे पोलिसांची कारवाई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रीचे संपादित आणि आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी

Nashik : नाशिकमध्ये आजपासून 65 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा, 23 नाट्यप्रयोगांची मेजवानी

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी

Chipi Airport : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचा शुभारंभ; मंत्री नितेश राणे यांनी स्वतः विमानाने प्रवास करत लुटला आनंद

[caption id="attachment_1075646" align="aligncenter" width="850"] दोन वर्षांच्या खंडानंतर नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सोमवारी पुन्हा सुरू झाली.[/caption] [caption

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका वाढला ! आंध्र प्रदेशसह दक्षिण ओडिशाला अलर्ट

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने आता डीप डिप्रेशनचे स्वरूप धारण केले

Crime News : तुझा पायगुण चांगला म्हणत महिलेला पेढा भरवला अन् भयानक घडलं, दोन महिने विवाहितेवर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करणारी

Prince William India Visit : प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन आज मुंबईत दाखल होणार; अर्थशॉट पुरस्कार सोहळ्यासाठी भारत दौरा

मुंबई : ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन हे तीन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज मुंबईत