मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रीचे संपादित आणि आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दिल्लीतील एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचे नाव चर्चेत असले, तरी पोलिसांनी तक्रारदार अभिनेत्रीची अधिकृत ओळख जाहीर केलेली नाही.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका वाढला ! आंध्र प्रदेशसह दक्षिण ओडिशाला अलर्ट
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने आता डीप डिप्रेशनचे स्वरूप धारण केले असून, संभाव्य चक्रीवादळाचा धोका वाढला ...
सोशल मीडियावर अपलोड केले आक्षेपार्ह फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने एका बॉलिवूड अभिनेत्रीचे फोटो मिळवून त्यात बदल केले आणि ते सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप आहे. हे फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्रीने वांद्रे पोलिसांशी संपर्क साधला. संबंधित सोशल मीडिया खात्यावरून हे फोटो अपलोड करण्यात आल्याचे तिने तक्रारीत नमूद केले.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 13 नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपीचे ठिकाण शोधून काढले. त्यानंतर वांद्रे पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले आणि तेथून संशयिताला अटक करण्यात आली.
आरोपीने फोटो एडिट करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले, मूळ फोटो कुठून मिळवले आणि हे कृत्य करण्यामागील हेतू काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
आरोपीवर मानसिक उपचार सुरू असल्याची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयितावर मानसिक उपचार सुरू आहेत. मात्र, या माहितीच्या आधारे त्याच्या कथित कृत्याचे कारण किंवा गुन्ह्याशी संबंधित कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत.