चुकीला माफी नाही..! गुरनूर ब्रार आयसीसीने दिला दणका, टिम सैफर्टसोबत तसं वागणं पडलं महागात

भारताने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 3-1 ने जिंकली. पाचव्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली आणि जेतेपदावर नाव कोरलं. पण या मालिकेतील चौथ्या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला होता. आयसीसीने त्याची दखल घेत गुरनूर ब्रारला दणका दिला आहे.

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 मालिकेनंतर वनडे मालिकेत विजय मिळवला. आता भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार याला धक्का बसला आहे. चौथ्या वनडे सामन्यात आक्रमक सेलिब्रेशन करणं गुरनूर ब्रारला महागात पडलं आहे. न्यूझीलंडचा ओपनर टिम सैफर्ट याला बाद केल्यानंतर त्याने आक्रमकपणे सेलिब्रेशन केलं आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आयसीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून क्रीडा भावनेविरुद्ध कृत्य मानलं आहे. आयसीसीने सदर प्रकारानंतर गुरनूर ब्रारच्या खात्यात एक डिमेरिट गुण जमा केला आहे. मागच्या 24 महिन्यात असं विचित्र वागण्याची गुरनूर ब्रारची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे त्याच्या खात्यात दोन डिमेरिट गुण जमा झाले आहेत.

नेमकं काय घडलं होतं?


चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना 12व्या षटकात सदर प्रकार घडला होता. या षटकात ब्रारने टिम सैफर्ट विकेट काढळी आणि आक्रमक जल्लोष केला. इतकंच काय तर त्याच्या जवळ जाऊन जोरात ओरडून सेलिब्रेशन केलं. पण गुरनूर ब्रारची ही कृती काही आयसीसीला आवडली नाही. सदर कृत्य फलंदाजाला अपमानित करणारं होतं असं आयसीसीने सांगितलं. यामुळे समोरूनही तशीच प्रतिक्रिया येऊ शकली असती. त्यामुळे ब्रारला आयसीसीने आचारसंहितेच्या कलम 2.5 चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी मानलं आहे. या कलमांतर्गत फलंदाजाला बाद केल्यानंतर आक्रमक भाषा, हावभावामुळे समोरून तशीच प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते.





गुरनूर ब्रारने चूक कबुल केली


भारताचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार याने आपली चूक कबूल केली आहे. आयसीसीचे सामनाधिकारी पॅनेलचे रंजन मदुगल्ले यांनी सुनावलेली शिक्षा त्याने मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही औपचारिक सुनावणी झाली नाही. आयसीसीच्या स्तर 1च्या गुन्ह्यासाठी किमान शिक्षा म्हणजे ताकीद दिली जाते. तर कमाल शिक्षेत सामना मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावला जातो. इतकंच काय तर एक किंवा दोन डिमेरिट गुण दिले जाऊ शकतात.
Comments
Add Comment

Mitchell Santner : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून न्यूझीलंडचा स्टार खेळाडू बाहेर, किवी संघाला मोठा धक्का

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आगामी 2 सामन्यांच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

MS Dhoni: चेन्नईकरांच्या हृदयात धोनीला 'थाला'ची जागा कशी मिळाली?

रांचीमध्ये वाढलेला एक साधा मुलगा पुढे जाऊन चेन्नईकरांच्या मनात घर करेल, असं कुणीही स्वप्नातही विचार केला नसेल.

'कॅप्टन कूल'ची आयपीएलमधून छप्परफाड कमाई! प्रत्येक हंगामात धोनीला किती मानधन मिळाले? जाणून घ्या

[caption id="attachment_1076162" align="aligncenter" width="800"] आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आयपीएल स्पर्धेच्या

'थाला फॉर अ रीजन' धोनीशिवाय सीएसकेची कल्पनाच अशक्य...

एमएस धोनी... भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा प्राण असलेल्या महेंद्रसिंग धोनीने

महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट कारकिर्दीत एकदा मेंटॉर झाला, पण...! चेन्नई सुपर किंग्ससाठी वेगळं काय करणार?

आयपीएल स्पर्धेतील धोनी पर्वाचा शेवट झाला आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून 2026 पर्यंत धोनी नावाचं वलय या चेन्नई सुपर

'दावे की कावे' इतके दिवस बनावट गोलंदाजी करत खेळला, वेगवान गोलंदाजावर क्रिस श्रीकांत यांच सडेतोड उत्तर

हर्षल पटेल गुजरात टायटन्सकडे ट्रेड होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच, भारतीय क्रिकेट संघाचे माजी