Tuesday, November 17, 2026

Cyclone Akwan Speed : ताशी १४५ किमी वेगाने धडकणार 'अकवान' चक्रीवादळ; आंध्र प्रदेश, ओडिसामध्ये हाय अलर्ट, शाळांना सुट्ट्या जाहीर तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता

या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका ओडिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांना असून, तेथील प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. ओडिसा सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी तब्बल ६० विशेष पथके (टिम्स) तैनात केली आहेत, तर एनडीआरएफच्या (NDRF) १४ तुकड्या आधीच सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता एका तीव्र चक्रीवादळात बदलत असून, या भीषण '' (Akvan) चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. १७ ते १८ नोव्हेंबर दरम्यान हे वादळ अधिक तीव्र होणार असून, १९ नोव्हेंबरला ते अत्यंत घातक रूप धारण करेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. हे वादळ ताशी १३० ते १४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली असून युद्धापातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.

ओडिसा आणि आंध्र प्रदेशात हाय अलर्ट आणि कडक उपाययोजना

या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका ओडिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांना असून, तेथील प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. ओडिसा सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी तब्बल ६० विशेष पथके (टिम्स) तैनात केली आहेत, तर एनडीआरएफच्या (NDRF) १४ तुकड्या आधीच सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रायगडा, गंजाम, गजपती, कोरापुट, पुरी आणि मलकानगिरी या जिल्ह्यांमध्ये विशेष प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता काही भागांमधील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत, तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून गर्भवती महिलांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करून आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

१३ वर्षांनंतर पुनरावृत्ती आणि महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम ?

या महाभयंकर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दूरवर असलेल्या परिसरातील वातावरणातही बदल झाला असून, अनेक भागांमधून थंडी अचानक गायब झाली आहे. याआधी २०१३ मध्ये अशाच प्रकारची दुर्मिळ परिस्थिती पाहायला मिळाली होती, जेव्हा अवघ्या २५ दिवसांत बंगालच्या उपसागरात 'हेलेन', 'लहर' आणि 'माडी' अशी तब्बल तीन चक्रीवादळे निर्माण झाली होती. यंदाही अगदी तशीच पुनरावृत्ती होत असून एकामागून एक तीन चक्रीवादळे तयार झाली आहेत. दरम्यान, या चक्रीवादळाचा थेट धोका महाराष्ट्राला नसला, तरी या हवामानाच्या बदलामुळे राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पडणारा हलका पाऊस बळीराजासाठी काहीसा दिलासादायक ठरू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >