Nandur Madhmeshwar Bird Sanctuary : नांदूरमध्यमेश्वरमध्ये विदेशी पाहुण्याची एन्ट्री ! सोनेरी डोळ्यांचा 'टफ्टेड डक’ ठरतोय आकर्षण

नांदूरमध्यमेश्वर पाणथळ क्षेत्र हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवासस्थान म्हणून ओळखले जाते. हिवाळ्याच्या काळात विविध देशांतून हजारो पक्षी या परिसरात दाखल होतात.

नाशिक : युरोपियन सायबेरिया आणि आइसलँडच्या अतिथंड प्रदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करत सोनेरी-पिवळे डोळे आणि डोक्यावर आकर्षक तुरा असलेला दुर्मिळ दिसणारा ‘टफ्टेड डक’ (Tufted Duck) नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दाखल झाला आहे. हिवाळी स्थलांतराच्या हंगामात या विदेशी पाहुण्याचे आगमन झाल्याने पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


गडद काळ्या रंगाचे चमकदार पंख, उठावदार सोनेरी-पिवळे डोळे आणि डोक्याच्या मागील बाजूस असलेला मुकुटासारखा तुरा यामुळे टफ्टेड डक इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा ठरतो. त्याचे आकर्षक रूप सध्या नांदूरमध्यमेश्वरच्या पाणथळ परिसरातील पक्षीनिरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.



पाण्याखाली डुबकी मारून शोधतो अन्न


टफ्टेड डक हा उत्कृष्ट जलपक्षी असून पाण्यात डुबकी मारून अन्न मिळवण्यात तो तरबेज आहे. पाण्याच्या तळाशी जाऊन शंख-शिंपले, लहान जलचर आणि इतर खाद्यपदार्थ शोधून तो आपली भूक भागवतो. धोका जाणवल्यास क्षणात पाण्याखाली डुबकी मारून काही अंतरावर पुन्हा पाण्याबाहेर येण्याची त्याची खासियत आहे. त्यामुळे त्याचे निरीक्षण करणे पक्षीनिरीक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरत आहे.






स्थलांतरित पक्ष्यांसाठी नांदूरमध्यमेश्वर महत्त्वाचे केंद्र


नांदूरमध्यमेश्वर पाणथळ क्षेत्र हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवासस्थान म्हणून ओळखले जाते. हिवाळ्याच्या काळात विविध देशांतून हजारो पक्षी या परिसरात दाखल होतात. त्यांच्या आगमनामुळे येथील जैवविविधतेत भर पडत असून पक्षीप्रेमींसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनले आहे.


नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी पक्षीप्रेमींना या सोनेरी डोळ्यांच्या विदेशी पाहुण्याचे निरीक्षण करण्यासाठी अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पक्षीनिरीक्षण करताना शांतता राखावी, पक्ष्यांना त्रास होईल असे वर्तन टाळावे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करावे, असेही त्यांनी सांगितले.निसर्गाच्या या अनोख्या सोहळ्यात टफ्टेड डकच्या आगमनामुळे नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षीवैभवात आणखी एका आकर्षक पाहुण्याची भर पडली आहे.

Comments
Add Comment

'दावे की कावे' इतके दिवस बनावट गोलंदाजी करत खेळला, वेगवान गोलंदाजावर क्रिस श्रीकांत यांच सडेतोड उत्तर

हर्षल पटेल गुजरात टायटन्सकडे ट्रेड होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच, भारतीय क्रिकेट संघाचे माजी

MSRTC Record Collection: लालपरीची दिवाळी जोरात! एका दिवसात कमावले 46.53 कोटी रुपये

मुंबई:  दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासोबतच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिकमध्ये AI Deepfake चा धक्कादायक प्रकार उघड ! मुलीचा हुबेहूब चेहरा अन् आवाज वापरून थेट...

नाशिक : सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जात आहे. AI Deepfake च्या माध्यमातून

Yavatmal Viral Boy: स्टायलिश लूक अन् रुबाबदार अंदाज! यवतमाळच्या रुद्रांशचा सोशल मीडियावर जलवा; व्हिडीओला 11 कोटी व्ह्यूज

सोशल मीडियाच्या जगात कोण कधी प्रसिद्ध होईल, याचा काही नेम नाही. दररोज हजारो व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड होतात. मात्र,

SIR : ‘एसआयआर’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी आधी काँग्रेसच्या भूमिकेची उत्तरे द्यावीत; आशिष शेलार यांचा सवाल

Political News: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

Nirmal Singh Ji Maharaj: गुरुजींच्या महासत्संगात बॉलिवूड सेलिब्रिटी भावुक; भूमी पेडणेकर, हिमेश रेशमियांचे व्हिडिओ व्हायरल!

Nirmal Singh Ji Maharaj: अध्यात्मिक गुरू निर्मल सिंह जी महाराज (छतरपुर वाले गुरुजी) यांच्या महासत्संगातील बॉलिवूड