MSRTC Record Collection: लालपरीची दिवाळी जोरात! एका दिवसात कमावले 46.53 कोटी रुपये

दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासोबतच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीला भरभरून पसंती दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 16 दिवसांत लालपरीने तब्बल 584 कोटी 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

मुंबई:  दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासोबतच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीला भरभरून पसंती दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 16 दिवसांत लालपरीने तब्बल 584 कोटी 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या काळात दररोज सरासरी 34 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी परतीच्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसटीने एकाच दिवसात 46 कोटी 53 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवण्याचा नवा उच्चांक तयार केला आहे.


दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच ऑक्टोबर महिन्यात महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीतील सक्तीमुळे एसटीच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र, यंदा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण, सलग सुट्ट्या, प्रवाशांची वाढलेली संख्या आणि महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीत देण्यात आलेली शिथिलता यामुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठी चालना मिळाली आहे. यामुळे लालपरीने नवे उच्चांक गाठण्यात यश आले आहे.






दरवर्षी गर्दीच्या हंगामात आकारली जाणारी हंगामी भाडेवाढ यंदा रद्द करण्यात आली होती, ही यंदाच्या दिवाळी हंगामातील आणखी एक महत्त्वाचा निर्णय ठरला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातही प्रवाशांना त्याच तिकीट दरात प्रवास करता आला. परिणामी खासगी वाहतुकीच्या तुलनेत सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय म्हणून एसटीने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.


एसटीच्या या विक्रमी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील बसने प्रवास करणाऱ्या तमाम प्रवाशांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या एसटी महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि प्रवाशांचा विश्वास यांच्या जोरावर लालपरीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. दिवाळीतील हा विक्रमी प्रतिसाद म्हणजे एसटीवरील जनतेच्या अढळ विश्वासाची पावतीच ठरली आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले आहे.

Comments
Add Comment

Prince William Mumbai : मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केट मिडलटनचा 'बॉस-लेडी' अंदाज, तर प्रिन्स विल्यम्सच्या कॅज्युअल लूकने वेधले लक्ष!

वांद्रे-वरळी सी-लिंकसमोर रिक्षा सफारीचाही घेतला आनंद मुंबई : ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स विल्यम्स आणि

Eknath Shinde: बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना सरसावली

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त

Nitesh Rane vs Rohit Pawar : रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची हिंमत करू नये! मंत्री नितेश राणेंचा इशारा

पवार कुटुंबीयांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुंबई : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी

टॅक्सीचालकांची मनमानी थांबणार! मुंबईतील 6 रेल्वे स्थानकांवर प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू होणार

लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांकडून होणारी अतिरिक्त भाडे आकारणी रोखण्यासाठी आणि त्यांना

Virar Churchgate Local : धावत्या विरार-चर्चगेट लोकलमधील वादातून भिरकावलेला चाकू लागल्याने ५३ वर्षीय प्रवासी जखमी; वांद्रे स्थानकात तरुणाला अटक

मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वादातून एका तरुणाने भिरकावलेला चाकू चुकून दुसऱ्याच प्रवाशाला

Mumbai News: अफलातून मिठाईचा तुकडा ठरला जीवघेणा, मुंब्रा येथील तरुणाचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

मुंबई : मुंब्र्यात अफलातून मिठाई खाल्ल्यानंतर झुबेर अन्सारी या 35 वर्षीय व्यक्तीचा अनेक अवयव निकामी झाल्याने