Nashik : इगतपुरीत साई निवाऱ्याचा स्लॅब कोसळला,15 ते 17 साई भक्त गंभीर जखमी

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील 'साई निवारा' या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत १५ ते १७ साई भक्त गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणारे शहापूर परिसरातील काही भाविक इगतपुरीतील साई निवारा येथे मुक्कामासाठी थांबले होते. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर सर्व भाविक विश्रांती घेत असतानाच अचानक इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळला. यावेळी स्लॅबचे गर्डर तसेच लोखंड आणि सिमेंटपासून बनवलेल्या फरशा थेट भाविकांच्या अंगावर पडल्या.






अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे निवाऱ्यात एकच गोंधळ उडाला. स्लॅब कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकही घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक राज जावरे, पोलीस प्रशासन आणि महामार्ग टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.


यानंतर स्थानिक नागरिक आणि मदत पथकांच्या सहकार्याने जखमी भाविकांना बाहेर काढून तातडीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून, दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रवासादरम्यान भाविकांच्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साई निवारा इमारतीची अवस्था आणि स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

BSc Nursing College: बीएससी नर्सिंग कॉलेजच्या समोर उबाठा आडवे

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रयातील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील

मुंबईत तात्पुरत्या अंगणवाड्यांसाठी उद्यान, मैदानांमध्ये कंटेनरची सुविधा? ठरावाच्या सूचनेद्वारे केली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक एसआरए तसेच इतर गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बालवाडीच्या जागा बाधित होत

Mumbai Food Safety: मुंबईतील हॉटेल्स, रेस्तराँमध्ये लाईव्ह किचन स्क्रीन बसवणे बंधनकारक

मुंबई (विशेष प्रतिनिधी): खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता निर्माण व्हावी आणि नागरिकांच्या आरोग्याचे

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी बातमी! 22 डिसेंबरला अंतिम मतदार यादी; निवडणूक आयोगाने जाहीर केले नवे वेळापत्रक

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात (SIR-2026) भारतीय निवडणूक आयोगाने

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 'तारा गॅस' टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला; 22 हून अधिक कर्मचारी सुरक्षित, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ

जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz)

नेमबाजीच्या मैदानाबाहेरही मनू भाकरचा धमाका! जागतिक स्तरावर मिळाली सर्वात मोठी जबाबदारी; आता थेट नियम ठरवणार!

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकांची कमाई करून संपूर्ण देशाची मान उंचावणारी भारताची स्टार नेमबाज मनू भाकर आता जागतिक