IPL 2027 Auction: आयपीएल 2027 लिलावाची प्रतीक्षा संपली! तारीख आणि वेळ जाहीर
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यासाठी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादीही जाहीर केली आहे. असं असताना लिलाव प्रक्रिया नेमकी कधी आणि केव्हा पार पडणार? याबाबत जाहीर करण्यात आलं आहे.
November 18, 2026 03:53 PM
IPL 2027 Auction: आयपीएल 2027 लिलावाची प्रतीक्षा संपली! तारीख आणि वेळ जाहीर (Photo: ANI)
आयपीएल स्पर्धेचं 20वं पर्व वर्ष 2027 मध्ये पार पडमार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. फ्रेंचायझींनी ट्रेड विंडोच्या माध्यमातून संघात आवश्यक खेळाडूंची देवाणघेवाण केली आहे. इतकंच काय तर रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावंही जाहीर केली आहेत. आता प्रतीक्षा आयपीएल स्पर्धेपूर्वीच्या मिनी लिलावाची आहे. असं सर्व चर्चा सुरू असताना बीसीसीआयने मिनी लिलावाची तारीख जाहीर केली आहे. या लिलावासाठी आता एका महिन्याचा अवधी शिल्लक आहे. विशेष म्हणजे, या वर्षीचा लिलाव हा दिवसा सुरू होऊन संध्याकाळपर्यंत असणार आहे. आयपीएल लिलाव प्रक्रिया डिसेंबरमध्ये पार पडणार आहे. त्याची तारीख यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्या बाबत निश्चित असं काही सांगितलं नव्हतं. पण आता तारीख निश्चित झाली असून 16 डिसेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. हा लिलाव गोव्यात होणार असून बुधवार आहे. लिलाव प्रक्रिया रात्री उशिरा नाही तर दिवसा सुरू होणार आहे. तसेच हा लिलाव संध्याकाळी संपू शकतो. लिलावाची वेळ सकाळी 11 वाजताची आहे.
सर्व दहा संघांमध्ये 66 जागा शिल्लक!
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर 66 जागा शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व संघ मिळून 66 जागाच भरू शकतात. यात 25 विदेशी खेळाडूंसाठी जागा आहे. आयपीएल नियमानुसार, एक संघ आपल्या संपूर्ण स्क्वॉडमध्ये किमान 18 आणि कमाल 25 खेळाडू घेऊ शकतो. दरम्यान, गुजरात टायटन्सने सर्वाधिक 22 खेळाडू रिटेन केले आहे. चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी 19 खेळाडू कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल मिनी ...
कोणत्या फ्रेंचायझी किती पैसे शिल्लक?
आयपीएल मिनी लिलावात फ्रेंचायझींकडे खेळाडू घेण्यासाठी किती पैसे शिल्लक आहेत हे देखील महत्त्वाचं आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या पॉकेटमध्ये सर्वाधिक पैसे आहेत. लखनौ सुपर जायंट्सकडे 47.45 कोटी रुपये आहेत. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा नंबर लागतो. केकेआरकडे बोली लावण्यासाठी 41.65 कोटी रुपये आहेत. सनरायझर्स हैदराबादकडे 40 कोटी, दिल्ली कॅपिटल्स 39, मुंबई इंडियन्सकडे 32.60 कोटी, चेन्नई सुपर किंग्सकडे 28.05 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 27.05 कोटी, पंजाब किंग्सकडे 18.60 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 14.15 कोटी आणि गुजरात टायटन्सकडे 8.75 कोटी रुपये आहेत. लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांकडे 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी शिल्लक असल्याने लिलावात या संघांकडे मोठी बोली लावण्याची ताकद असेल.