ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय रुग्णालये आणि सार्वजनिक सुविधांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनाकडून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. दिशा समितीच्या बैठकीत झालेल्या सखोल चर्चेत या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग देण्यात आला आहे. येत्या 26 जानेवारी 2028 पर्यंत राज्यातील सर्व शाळा आणि आरोग्य केंद्रे खाजगी शाळांच्या धर्तीवर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या पुढाकारातून प्रशासनाने केले आहे.
या सर्व प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात 18 नोव्हेंबर रोजी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आणि नियोजनात शाळांच्या आधुनिकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा अत्यंत योग्य प्रकारे आणि योग्य कामांसाठीच वापर केला जात असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या सर्व शाळांचे गेटपासून ते क्लासरूम, टॉयलेट आणि स्वयंपाकघरापर्यंत सखोल ऑडिट करण्यात आले. शाळांची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्यांची निर्मिती व आधुनिकीकरणासाठी सुमारे 550 कोटी रुपयांचे बजेट पुनर्विनियोजन करण्यात आले.
Mumbai BEST Bus Fire: ससून डॉकजवळ बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने आग नियंत्रित
Mumbai BEST Bus Fire: मुंबईतील कुलाबा येथील ससून डॉकजवळ आज, बुधवार 18 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी मार्ग क्रमांक 139 च्या बेस्ट बसला आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही ...
तसेच खाजगी शाळांच्या दर्जाप्रमाणे सरकारी शाळांची रचना करण्यात येणार असून, यामध्ये लायब्ररी, प्रयोगशाळा आणि एआय लॅब यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येईल. जिथे वर्ग संख्या कमी आहे, तिथे मागणीनुसार आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग वाढवण्याचे व सेमी-इंग्रजी शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत कधीही एकाच वेळी सर्व शाळांचे नूतनीकरण झाले नव्हते, परंतु पहिल्यांदाच हा ऐतिहासिक उपक्रम उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. 26 जानेवारी 2028 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आदर्श ग्रामीण रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयाला पहिल्या टप्प्यात 500 बेडच्या अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.
नागरी सुविधांच्या विकासांतर्गत महानगरपालिका व नगरपालिकांच्या वॉर्ड्समध्ये ओपन स्पेस डेव्हलपमेंट, स्पोर्ट्स सुविधा, जिम, लायब्ररी, लहान मुलांसाठी खेळण्याची जा 15 हजार लोकसंख्या असलेल्या एका दलित वस्तीची 'पायलट' म्हणून निवड करून, प्रत्यक्षात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या गरजेनुसार सुविधा निर्माण करण्याचे निर्देश प्रशासकीय प्रमुखांना देण्यात आले आहेत.
पर्यावरणपूरक उपाययोजनांच्या भागातून वालधुनी व उल्हास नदी पुनरुज्जीवनाचे मोठे नियोजन करण्यात आले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि निरी यांच्या सहकार्याने नदीत जाणारे अनट्रीटेड सांडपाणी पूर्णपणे बंद केले जाणार आहे. तसेच, ग्रामीण भागात क्लस्टर पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, कंपोस्टिंग आणि बंदिस्त इनडोअर प्रकल्पांच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन केले जाणार आहे. तर ज्या नदीमध्ये प्रदूषित पाण्याचे स्त्रोत शोधण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा सूचना ही यावेळी देण्यात आल्या. या सर्व प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून, सर्वसामान्यांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीसाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कुळगाव बदलापूर महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.