Aadhaar Card : आधार कार्डचा वापर कुठे झाला? घरबसल्या तपासा 6 महिन्यांची हिस्ट्री; अनोळखी व्यवहार दिसल्यास 'हे' काम करा!

या सुविधेद्वारे गेल्या 6 महिन्यांतील आधार व्हेरिफिकेशनची माहिती पाहता येते.




























मुंबई : आधार कार्डचा वापर अनेक सरकारी आणि खासगी सेवांसाठी केला जातो. मात्र, आपल्या आधार क्रमांकाचा वापर नेमका कुठे आणि कधी झाला, याची माहिती अनेकांना नसते. आधार कार्डशी संबंधित कोणत्याही अनोळखी व्हेरिफिकेशनची माहिती मिळवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ऑथेंटिकेशन हिस्ट्री तपासण्याची सुविधा देते. या सुविधेद्वारे गेल्या 6 महिन्यांतील आधार व्हेरिफिकेशनची माहिती पाहता येते.






आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री कशी तपासायची?


यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 'Aadhaar Authentication History' हा पर्याय निवडावा. माय आधार पोर्टलवरूनही ही सेवा उपलब्ध आहे. त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्चुअल आयडी टाकून स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरावा. पुढे रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करावे.


यानंतर आधारशी संबंधित व्हेरिफिकेशनची माहिती स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये व्यवहाराची तारीख, वेळ, कोणत्या प्रकारचे व्हेरिफिकेशन झाले, संबंधित एजन्सी आणि व्यवहार यशस्वी झाला की नाही, याची माहिती मिळू शकते.



अनोळखी व्यवहार दिसल्यास काय करावे?


हिस्ट्री तपासताना एखादी संशयास्पद नोंद दिसल्यास तिची तारीख, वेळ आणि उपलब्ध माहिती जतन करून ठेवावी. त्यानंतर संबंधित सेवा देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधून आधारचा वापर कोणत्या कारणासाठी झाला, याची माहिती घ्यावी. गैरवापर झाल्याचा संशय असल्यास UIDAI कडे तक्रार करता येते. यासाठी 1947 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.



आधार सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा


आधारचा गैरवापर टाळण्यासाठी बायोमेट्रिक लॉकची सुविधा वापरता येते. यामुळे फिंगरप्रिंट आणि डोळ्यांच्या बुबुळांद्वारे होणारे व्हेरिफिकेशन रोखता येते. गरजेनुसार हे लॉक पुन्हा अनलॉक करता येते.


तसेच आधार क्रमांक देण्याऐवजी व्हर्चुअल आयडीचा वापर करावा. ओळखीसाठी आधार आवश्यक असल्यास मास्क्ड आधार कार्ड द्यावे. यामध्ये आधार क्रमांकाचे सुरुवातीचे 8 अंक लपवलेले असतात. आधारशी संबंधित OTP कोणालाही सांगू नये आणि आधारची पूर्ण प्रत अनावश्यक ठिकाणी देणे टाळावे. या खबरदारीमुळे आधारशी संबंधित माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते.


























Comments
Add Comment

Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!

'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या

मुंबईत चाहत्याला ऑटोग्राफ देण्यास केट मिडलटन यांचा नकार; नेमकं कारण काय?

प्रिन्स विल्यमसोबत केट मिडलटन मुंबईत दाखल झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने

IPL 2027: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला सोडलं, आता कोण होणार कर्णधार?

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. कोलकाता

टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंडची घातक चाल; खेळपट्टीवर उतरवणार 3 वेगवान अस्त्रे!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून

Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रखडलेली मदत मिळवण्यासाठी 2 महिन्यांची मुदत

मुंबई :  शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे अद्याप जमा झाले नसल्या

Nashik Crime : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून अवैध सावकारी ! पंचवटीतील सराफा व्यावसायिकावर गुन्हा दाखल

नाशिक : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून नागरिकांना रोख रक्कम देणे आणि त्यावर व्याज आकारून अवैध सावकारीचा