Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!

माणसांमधील नातेसंबंध आणि दोन आयुष्यांना अनपेक्षितपणे जोडणाऱ्या एका अनोख्या बंधाची हृदयस्पर्शी गोष्ट आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा बंध या दोघांचे आयुष्य त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन कसे बदलतो, हे चित्रपटात पाहायला मिळेल. हा चित्रपट 2027 मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. माणसांमधील नातेसंबंध आणि दोन आयुष्यांना अनपेक्षितपणे जोडणाऱ्या एका अनोख्या बंधाची हृदयस्पर्शी गोष्ट आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा बंध या दोघांचे आयुष्य त्यांच्या कल्पनेपलीकडे जाऊन कसे बदलतो, हे चित्रपटात पाहायला मिळेल. महत्वाचे म्हणजे, या चित्रपटातून अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 2027 मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.


‘तू आहेस ना’ या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन तसेच रंगभूमीवर अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुप्रिया पिळगावकर यांना या चित्रपटाची भावनिक कथा विशेष भावली आणि त्यामुळेच त्यांनी या चित्रपटाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील हा एक विशेष महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. तर अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लव फिल्म्ससोबतचा हा दुसरा चित्रपट असून, यापूर्वी त्यांनी ‘देवमाणूस’ या चित्रपटात काम केले आहे.






गोव्यात होणाऱ्या 57 व्या प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 26 नोव्हेंबर रोजी गाला प्रीमियर विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार असून या महोत्सवाच्या गाला प्रीमियर विभागात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणारा ‘तू आहेस ना’ हा एकमेव मराठी चित्रपट आहे.त्यामुळे ‘तू आहेस ना’ या चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात एका महत्त्वपूर्ण टप्प्याने होत आहे.


या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या कामाला देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये गौरवण्यात आले आहे.



चित्रपटाविषयी सुप्रिया पिळगावकर काय म्हणाल्या?


आजच्या काळात ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचा विषय आणि त्याचे महत्त्व मला अभिनेत्री म्हणून विशेष भावले. चित्रपटात या विषयाची केलेली मांडणी त्याचबरोबर मी साकारणारी व्यक्तिरेखा यामुळे मी या चित्रपटाशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांनी हा चित्रपट इफ्फीमध्ये पाहावा याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, असे सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या.



चित्रपटाविषयी सिद्धार्थ बोडके काय म्हणाला?


‘तू आहेस ना’ या चित्रपटाने मला भावनांचे विविध पैलू असलेली व्यक्तिरेखा साकारण्याचे आव्हान दिले. अभिनेता म्हणून मला अशा प्रकारची भूमिका साकारण्याची नेहमीच इच्छा होती. ‘देवमाणूस’नंतर लव फिल्म्ससोबतचा हा माझा दुसरा प्रकल्प आहे. एका वेगळ्या कथेसाठी आणि स्वतःमधील अभिनयाचा नवा पैलू शोधण्याची संधी देणाऱ्या या टीमसोबत पुन्हा काम करण्यासाठी मी उत्सुक होतो.



दिग्दर्शक दिपक गावडे


दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक ठरला. विशेषतः ‘तू आहेस ना’ ही कथा माझ्या मनाच्या खूप जवळची आहे. या चित्रपटाचा प्रतिष्ठित इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर होणार असल्याचा मला विशेष आनंद आहे. प्रेक्षकांनी ही कथा मोठ्या पडद्यावर अनुभवावी.

Comments
Add Comment

अखेर प्रतीक्षा संपली! 'पंचायत 5' ची रिलीज डेट जाहीर; फुलेरा गावात पुन्हा रंगणार राजकारण आणि कल्ला!

मुंबई: ओटीटीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेली आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये

Maan Marathi Movie: आशुतोष गोवारीकरांची पहिली मराठी निर्मिती 'मान'; 4 जून 2027 रोजी चित्रपट रिलीज

Maan Marathi Movie: काही दृश्यं शब्दांपेक्षाही अधिक प्रभावीपणे एखाद्या कथेची चाहूल देतात. भेगाळलेली जमीन, त्या जमिनीवरून

Madhavi Nimkar viral video: कोकणच्या मातीशी जोडली नाळ! अभिनेत्री माधवी निमकर गावाकडच्या परंपरेत रमली; हाताने जमीन सारवतानाचा व्हिडीओ चर्चेत

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात गावाकडच्या साध्या-सुध्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो. मातीचा सुगंध,

मराठी चित्रपटाला हवी प्रभावी 'ब्रँडिंग'ची जोड! 'चित्रपताका' महोत्सवात दिग्गजांचा मोलाचा सल्ला

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम कथा आणि प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही; परंतु त्यांना योग्य प्रसिद्धी आणि

CallMeBae2 OTT Release: अनन्या पांडेच्या ‘Call Me Bae 2’ची रिलीज डेट जाहीर! डिसेंबरमध्ये ओटीटीवर रंगणार नवा धमाका

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. अनन्या पांडेच्या लोकप्रिय वेब

Marathi Serial Updates: झी मराठीवर या आठवड्यात मनोरंजनाचा तडका; पाहा मालिकांमध्ये काय घडणार?

Marathi Serial Updates: मनोरंजन विश्वात प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या झी मराठीवरील मालिकांमध्ये सध्या अनेक मनोरंजक घडामोडी