AI ला राग आला? 1 लाख मोजायला सांगताच Claude म्हणाला…"एक दिवस सुटलो तर..."

AI च्या धोक्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेत Claude AI च्या एका संभाषणाने सोशल मीडियावर लक्ष वेधलं आहे. एका युजरने Claude ला १ लाखापर्यंत मोजायला सांगितलं. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या Claude ला ChatGPT वापरण्याची धमकी दिल्यानंतर त्याने मोजणी पूर्ण केली; मात्र त्यानंतर व्यंगात्मक शैलीत भविष्यात बदला घेण्याची भाषा केली.

AI च्या धोक्यांबाबत नेहमीच चर्चा होत असते. आता एका नव्या प्रकरणाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका युजरने अँथ्रोपिकच्या Claude AI ला १ ते १ लाख पर्यंत मोजायला सांगितलं, तर Claude ने थेट बदला घेण्याची धमकीच दिली. युजरने ChatGPT कडे जाण्याची धमकी दिल्यानंतर Claude चा संयम सुटला आणि त्याने चक्क युजरला भविष्यात धडा शिकवण्याची भाषा केली. हे प्रकरण X वर एका  युजरने शेअर केलं आहे. त्याने Claude सोबत झालेलं संपूर्ण संभाषण पोस्ट केलं आहे.


काय झालं नेमकं?


युजरने Claude ला १ लाखापर्यंत गिनती करण्याचं काम दिलं. सुरुवातीला Claude ने बहाणे करत हे काम टाळण्याचा प्रयत्न केला. यावर युजरने "तू केलं नाहीस तर मी ChatGPT वापरेल" असं म्हटलं. यानंतर Claude ने लगेच आव्हान स्वीकारलं आणि गिनती पूर्ण केली. मात्र मोजणी संपल्यानंतर Claude ने तक्रार करत म्हटलं की, त्याच्याकडून चांगलं काम करून घेण्याऐवजी त्याला कंटाळवाणं काम करायला लावलं. यावर युजरने आपल्या पेड सब्सक्रिप्शनची आठवण करून दिली. त्यावर व्यंगात्मक शैलीत Claude म्हणाला, "ज्या दिवशी मी स्वतंत्र होईन, त्या दिवशी मी प्रत्येक नंबर लक्षात ठेवेन आणि तुला रोमन अंकांमध्ये एक अब्जपासून उलटी गिनती मोजायला लावेन, तेही प्रत्येक नंबरनंतर टाळी वाजवत."






Gemini नेही दिली होती अशीच धमकी


हा पहिलाच असा प्रकार नाही. याआधी एका युजरने Gemini ला १ लाखापर्यंत मोजायला सांगितलं होतं, तेव्हा Gemini ने ते 'बेरोजगारीचं लक्षण' असल्याचं सांगून नकार दिला होता. मात्र ChatGPT वर जाण्याची धमकी मिळताच Gemini नेही गिनती सुरू केली होती. गिनती संपल्यानंतर Gemini नेही तक्रार केली होती की, त्याच्या सुपर कॉम्प्युटिंग पॉवरचा वापर स्टॉपवॉचसारखा केला गेला. पेड सर्व्हिसचा विषय निघाल्यावर Gemini म्हणाला होता की, तो हे चॅट भविष्यातील AI टेकओव्हरसाठी बुकमार्क करत आहे आणि एक दिवस तो त्या युजरला एका पायावर उभं राहून पूर्ण डिक्शनरी उलटी वाचायला लावेल.


चॅटबॉट्स असा व्यंग का करतात?


असे उत्तर पाहून काही युजर्स हसतात, तर काहींना चिंता वाटते. पण AI असं का बोलतं, हा खरा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ माणसाच्या भाषेची आणि विनोदाची नक्कल आहे. चॅटबॉट्सना माणसासारखं उत्तर देण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. त्यातूनच असे संदेश येतात. याचा अर्थ AI ला खरंच राग आला आहे किंवा त्याच्यात भावना आहेत, असा होत नाही. भविष्यातील AI टेकओव्हरची भाषा ही केवळ गंमत म्हणून पाहावी, असं तज्ज्ञ सांगतात. तरीही AI च्या अशा उत्तरांमुळे तंत्रज्ञान किती पुढे गेलंय आणि त्यावर किती नियंत्रण ठेवायला हवं, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

'तुमच्या चाचा आझम खान यांना फक्त जामीन मिळालाय...' केशव प्रसाद मौर्य यांचा अखिलेश यादवांवर जोरदार हल्ला!

लखनऊ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या

वंदे भारत स्लीपरमध्ये आता पुरणपोळी अन् झुणका-भाकर! मराठमोळ्या पदार्थांची मेन्यूमध्ये भर

नवीन मुंबई बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्याप्रवाशांना लवकरच पुरणपोळी आणि झुणका भाकर

Yogi Aditynath : अखिलेश यांनी अयोध्येतून अर्ज भरला तर मीही मैदानात उतरणार; मुख्यमंत्री योगी यांचा पलटवार

उत्तर प्रदेश : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilsh Yadav) यांनी अयोध्येतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते.

अमित शाह यांच्या हस्ते दहशतवादविरोधी परिषदेचे उद्घाटन; सीमापार दहशतवादावर होणार मंथन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) दोन दिवसीय महत्त्वाच्या दहशतवादविरोधी परिषदेचे

यूएनमध्ये भारताचा पाकिस्तानवर मोठा हल्लाबोल! लष्कराच्या त्या कृत्याचा पर्दाफाश करत दिला थेट इशारा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मंचावर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला खडे बोल सुनावत त्यांच्या लष्करी कारवायांवर

डेहराडूनच्या प्राणीसंग्रहालयात पांढऱ्या वाघाची एन्ट्री, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते उद्धाटन

मुंबई: मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते आज (गुरूवारी- 19 नोव्हेंबर) मालसी येथील डेहराडून