Crime News : 'तुला सरकारी नोकरी लावून देतो' सांगत घातला 40 लाखांचा गंडा; वडापाव विकणाऱ्या दाम्पत्याची मोठी फसवणूक

याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

कल्याण : कल्याणमध्ये वडापावचा व्यवसाय करणाऱ्या एका दाम्पत्याला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 40 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिका (BMC) आणि सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत तिघांनी दाम्पत्याकडून एकूण 40,49,445 रुपये घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.



मंत्रालयातील ओळखीचा दावा करून विश्वास संपादन


पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, दीप्ती गौतम राजवत-पाटील (28) या पती गौतम राजवत यांच्यासोबत वडापावचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जुलै 2025 मध्ये दीप्ती यांच्या माहेरच्या ओळखीतील निधी नितीन अगीवाले (28) याने मंत्रालयातील ओळखीच्या माध्यमातून दोघांना सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.






यानंतर सुनील देशमुख याने स्वतःचा मंत्रालयाशी संबंध असल्याचे भासवून दाम्पत्याकडे वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. ओळखपत्र, अर्ज प्रक्रिया, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या, अर्ज हस्तांतरण, जीएसटी आणि शासकीय शुल्क अशा विविध कारणांचा खर्च सांगून पैसे घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.



रोख आणि ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतल्याचा आरोप


22 सप्टेंबर 2025 ते 6 मार्च 2026 या कालावधीत दाम्पत्याने UPI द्वारे 4,99,445 रुपये दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर देशमुखने ही रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायची असल्याचे सांगून नरेश तुकाराम चिंदारकर (35) याला पैसे देण्यास सांगितल्याचा आरोप आहे.


त्यानुसार, दाम्पत्याने कल्याणमधील अमृत पार्क येथे वेगवेगळ्या वेळी चिंदारकर याला 35.50 लाख रुपये रोख दिले. याशिवाय 1 लाख रुपयांचा रद्द केलेला चेकही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे एकूण 40,49,445 रुपये दिल्याचा दावा दाम्पत्याने केला आहे.



खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरू


वारंवार पैसे देऊनही दाम्पत्याला सरकारी नोकरी मिळाली नाही. पैशांबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे. अखेर दीप्ती यांनी खडकपाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


पोलिसांनी निधी अगीवाले, सुनील देशमुख आणि नरेश चिंदारकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पैशांचे व्यवहार, नोकरीचे आमिष दाखवण्यामागील पद्धत आणि प्रत्येक आरोपीची भूमिका यांचा तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

मैत्री की प्रेम? नात्यांमधील भावनिक गुंता उलगडणारा ‘मैत्रेया’ 20 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : काही नाती मैत्रीच्या चौकटीत सहज सामावतात, तर काही नकळत त्या चौकटीपलीकडे जातात. अशावेळी त्या नात्याला

Leopard News : चार दिवस उलटूनही नगरमधील बिबट्या मोकाट

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील दाट लोकवस्तीच्या भागासह प्रमुख शासकीय कार्यालयांच्या परिसरात गेल्या तीन

Illegal Sand Mining : नागपूर-वाळू माफियांवर ईडीची मोठी कारवाई; 16.23 कोटींची मालमत्ता जप्त, बनावट ई-टीपीद्वारे कोट्यवधींचा व्यवहार

Nagpur News: नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमधील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे.

Mumbai Tunnel Project : मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘पाताळ लोक’चा उतारा!

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आता जमिनीखालून रस्त्यांचे जाळे

Toilet Repair Campaign : गावोगावी शौचालयांची होणार पोलखोल, नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सरसावली; १० डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : गावोगावी स्वच्छतेचा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शौचालयांची दुरवस्था

ऑनलाइन बेटिंगच्या कर्जापायी वृद्धेची निर्घृण हत्या! गोव्यात मौजमजा करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कसे पकडले?

रायगड : ऑनलाइन बेटिंग आणि ट्रेडिंगच्या व्यसनामुळे मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या 21 वर्षीय तरुणाने