
मुंबई: राज्यात पोलीस भरतीची तयारी करणारे लाखो तरुण आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना आता मैदाने विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. सरकारने या तरूणांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सराव करण्यासाठीचा त्यांचा मार्ग आता मोकळा होणार आहे. याबाबत परिपत्रक काढण्यात आले.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सातत्याने तरुणांना विनामूल्य मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी मिशन खाकी' अंतर्गत पाठपुरावा केला होता. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारांच्या मेहनतीला योग्य पायाभूत सुविधांची जोड मिळावी आणि त्यांच्या पोलीस दलात सेवा करण्याच्या स्वप्नाला बळ मिळावे यासाठी 27 ऑक्टोबर 2026 रोजी पत्र लिहून निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने अधिसूचना जारी करण्यात आल्या. या निर्णयामुळे राज्यातील लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे.
तरुणांच्या 'खाकी'च्या स्वप्नासाठी मैदानांची दारे खुली!
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुणांना शारीरिक सरावासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संवेदनशील पुढाकाराने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने, क्रीडांगणे आणि धावपट्ट्या पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे अधिकृत निर्देश देण्यात आले आहेत. 'मिशन खाकी' या उपक्रमांतर्गत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील युवकांशी मी सातत्याने संवाद साधत आलो आहे. या संवादातून 'सरावासाठी मैदानांची उपलब्धता' ही त्यांची सर्वात मोठी गरज असल्याचे प्रकर्षाने समोर आले होते. युवकांच्या या व्यावहारिक अडचणीची उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी तात्काळ दखल घेत, हा लोकोपयोगी निर्णय मार्गी लावला आहे. सामान्य कुटुंबातील कष्टाळू तरुणांच्या मेहनतीला योग्य पायाभूत सुविधांची जोड मिळावी आणि त्यांच्या पोलीस दलात सेवा करण्याच्या स्वप्नाला बळ मिळावे, यासाठी हा निर्णय निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा मला दृढ विश्वास आहे. @mieknathshinde @Shivsenaofc — Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) November 18, 2026
गृह राज्यमंत्री योगेश कदम राज्यभरात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी 'मिशन खाकी' ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात मोहीम सुरू केली. याआनुषंगाने त्यांनी राज्यभरातील तरुणांशी संवाद साधला. त्यावेळी तरुणांनी अनेकदा मैदाने उपलब्ध होत नसल्याने भरतीची तयारी करण्यात मोठ्या अडचणींचा सामोरे जावे लागते, असे सांगितले. त्यामुळे 'सरावासाठी मैदानांची उपलब्धता' ही त्यांची सर्वात मोठी गरज असल्याचे प्रकर्षाने समोर आले होते. युवकांच्या या अडचणीची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन हा लोकोपयोगी निर्णय मार्गी लावला. त्यामुळे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्ने बाळगलेल्या लाखो तरुणांचा आत्मविश्वास वाढणार आहे असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
Mahabharat fame Actor Ayush Shah: 'महाभारत', 'नव्या' आणि 'उत्तराण' यांसारख्या टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आयुष शाह याची मोठी फसवणूक झाली आहे. ...
तसेच नगर विकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मालकीची मैदाने, क्रीडांगणे आणि त्यांच्या अंतर्गत व्यवस्थापन होत असलेली मैदाने पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते संबंधित संवर्गाची मैदानी चाचणी होईपर्यंत सरावासाठी सकाळी 05:00 - 09:00 अथवा सायंकाळी 04:00 ते रात्री 08:00 वाजेपर्यंत परवानगी द्यावी, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, यासाठी लागणारे स्वच्छ व सुरक्षित मैदान, क्रीडांगण, धावपट्टी तयार करून घेणे. सरावासाठी आलेल्या तरुणांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय आणि प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्राथमिक उपचाराची सोय करून देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, शिवछत्रपती क्रीडा संकुल, जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रे तसेच मान्यताप्राप्त क्रीडा संघटना यांचे सहकार्य घेण्यात यावेत, अशा सूचनाही जारी केलेल्या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत.






