आरे कॉलनतील आदिवासी जनतेला घराजवळ आरोग्य सुविधा, आरे रुग्णालय ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर

आरे कॉलनीतील आदिवासी जनतेसोबत स्थानिकांना आरोग्य सेवा आता मिळणार असून आरे रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात घेवून आरोग्य सेवा देण्याच्या प्रस्तावाला सुधार समितीने मंजुरी दिली आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): आरे कॉलनीतील आदिवासी जनतेसह स्थानिकांना आरोग्य सेवा आता मिळणार असून आरे रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात घेवून आरोग्य सेवा देण्याच्या प्रस्तावाला सुधार समितीने मंजुरी दिली आहे. या रुग्णालयाच्या डागडुजीसाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम शासनाकडून घेण्याची मागणी काँग्रेस आणि उबाठाच्या नगरसेवकांनी केली होती. पंरतु ही मागणी फेटाळून लवत आदिवासी जनतेसाठी याठिकाणी आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्णालयाची जागा ताब्यात घेत असल्याचे सांगत सुधार समितीने याला मान्यता दिली. विशेष म्हणजे याठिकाणी दवाखान्याप्रमाणे सेवा न उपनगरीय रूग्णालयांप्रमाणे विकसित केले जावे आणि याला बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. त्यामुळे आता आदिवासी जनतेला घराजवळ आरोग्य सुविधा मिळणार आहे.






गोरेगाव आरे दुग्ध वसाहतीच्या हद्दीत आरे न.भू.क्र. 38, आरे रुग्णालयाची इमारत आहे. या इमारतीची एकूण क्षेत्रफळ हे 1257.90 चौ.मीटर एवढे आहे. यात संलग्न शासकीय निवासस्थानांचे क्षेत्र 674.30 चौ.मीटर असे एकूण क्षेत्रफळ 1932.20 चौ. मीटर एवढे क्षेत्र "जसे आहे तशा स्थितीस" घेण्यात येणार आहे. याबाबत आरे दुग्ध आणि महापालिका करार करून राज्य शासनाकडून ही जमिन ताब्यात घेण्यासाठी आता सुधार समितीपुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. ही वास्तू स्ट्रक्चरल ऑडीट करून त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करत याठिकाणी महापालिकेच्यावतीने आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता जितेंद्र वळवी यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्याची सूचना करून आरे कॉलनीतील 27 आदिवासी पाडे आणि 32 युनिट्समधील रहिवाशांसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच येथील जनतेला आणि आदिवासी बांधवांना कशाप्रकारे वैद्यकीय उपचारासाठी दरमजल करावी लागत याची खंत मांडत अपघात विभागाची सुविधा ठिकाणी असावी अशी सूचना केली. यावर भाजपचे प्रकाश गंगाधरे यांनी हा प्रस्ताव आदिवासी जनतेसाठी मंजूर होणे आवश्यक असल्याचे सांगत याठिकाणी प्रसुतीगृहाची सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर काँग्रेसच्या मेहेर हैदर यांनी ही जागा सरकारची असल्याने सरकार याठिकाणी आरोग्य सेवा का देत नाही तसेच यासाठीचा निधी सरकार का देत नाही असा सवाल केला. तर अजित रावराणे यांनी मुंबईच्या हद्दीत आरे कॉलनी असून त्याठिकाणी तेथील आदिवासी जनतेला आरोग्य सेवा मिळायला हवी. तर चंदन शर्मा यांनीही फिल्टर पाडासह इतर पाड्यांमधील गरोदर महिलांची होणारी गैरसोय पाहता याठिकाणी प्रसुतीगृहाची सेवा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगितले.






उबाठाचे सचिन पडवळ यांनी सरकार आरोग्य सेवा देण्यात कुचकामी ठरत असल्याचा आरोप करत यासाठीचा 50 टक्के दुरुस्तीचा निधी सरकारने द्यावा अशी मागणी केली. तर विठ्ठल लोकरे यांनी आदिवासींच्या विकासासाठी सरकारकडे निधी असताना ते या आरे कॉलनीतील जनतेसाठी वैद्यकीय सेवांसाठी खर्च का करू शकत नाही असा सवाल केला. भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी उपनगरीय रुग्णालयाच्या धर्तीवर याठिकाणी रुग्णालय सुरु व्हायला हवे. आणि त्यात अपघात विभागही असायला हवा. बाळा तावडे यांनी या ठिकाणी महापालिकेच्यावतीने रुग्णालय सुरु करून त्याला बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत अनिष मकवानी आणि राजा यांनी भाग घेतला होता. यावेळी सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी शासनाने 50 टक्के निधी देण्याची मागणीची उपसूचना नामंजूर करून या रुग्णालयाला बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची मागणी मान्य करत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.






आरेतील जनतेच्या मागणीचा हा मोठा विजय


आरे रुग्णालयाची जागा महापालिकेच्या ताब्यात येवून तिथे जर महापालिकेच्यावतीने वैद्यकीय सेवा सुविधा प्राप्त होणार असेल तर आरेतील जनतेसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. मागील वेळेस हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवला होता आणि यावेळी तो पुन्हा प्रशासनाने मंजुरीसाठी सुधार समितीच्या पटलावर ठेवला होता. याबाबत मी स्वत: भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, सभागृहनेते गणेश खणकर, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांना निवेदन देवून यावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव संमत झाल्याने येथील जनतेच्या मागणीचा मोठा विजय अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Rinku Meets Modi: क्रिकेटर रिंकु सिंगने सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, दिलं लग्नाचं आमंत्रण...

मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज रिंकू सिंग लवकरच आयुष्यातील नव्या इनिंगची सुरूवात करणार आहे. यासाठी रिंकू

थिएटरमध्ये तुफान कमाई केल्यानंतर 'हनुमान अंश' OTT वर रिलीज होणार, कुठे होणार रिलीज; जाणून घ्या तारीख

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित, 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. 2

Mumbai Fire: परळच्या कामगार स्टेडियममध्ये भीषण आग, लाकूड आणि बांबूच्या साहित्याला आग; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबईतील दादर पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील प्रसिद्ध कामगार स्टेडियममध्ये रविवारी

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

मुंबई: महाराष्ट्र सरकारने जनतेला उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन

मुंबई: राज्यात फळबागा असलेल्या एकूण 6 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे 2.5 लाख