मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज रिंकू सिंग लवकरच आयुष्यातील नव्या इनिंगची सुरूवात करणार आहे. यासाठी रिंकू सिंगने आपल्या कुटुंबासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेत, त्यांना आपल्या विवाहाचे निमंत्रण दिले. खास भेटी दरम्यानचे फोटो रिंकु सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. रिंकुने शेअर केलेल्या फोटोमध्ये रिंकु आई, भाऊ आणि बहिणीसोबत पंतप्रधानांना पुष्पगुच्छ आणि पत्रिका देताना दिसत आहे. रिंकू सिंग समाजवादी पक्षाच्या तरुण खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत येत्या 4 डिसेंबर रोजी, विवाहबद्ध होणार आहे. या लग्नाच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेट आणि राजकारण यांचा हा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. क्रिकेटर रिंकूच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, न्युझीलंड विरुद्धची मालिका जिंकूनही 'या' चुकांवर दुर्लक्ष केलं तर...
मुंबई: न्युझीलंडमधील बे ओव्हल या होम ग्राऊंडमध्ये आज, न्युझीलंड विरुद्ध भारत हा सामना रंगला. ह्या शेवटच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने न्युझीलंडला ...
क्रिकेटर रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या मच्छलीशहरच्या खासदार प्रिया सरोज लखनौमध्ये 4 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. सरोज कुटुंबीयांकडून आणि सिंग कुटुंबीयांकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. यापूर्वीच सिंग कुटुंबीयांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन लग्नाचे आमंत्रण दिले आहे. त्यानंतर आता आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. रिंकु सिंग आणि प्रिया सरोज यांच्या लग्नासाठी देशासह उत्तर प्रदेशातील सुद्धा अनेक दिग्गज नेते मंडळी आणि क्रिकेटर्स लग्नाकरिता हजर राहण्याची शक्यता आहे. ज्यावेळी, रिंकु सिंग त्याच्या कुटुंबीयांसोबत पंतप्रधानांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी रिंकुसह त्याच्या सर्व कुटुंबीयांची त्यांनी विचारपूस केली. सध्या रिंकु आणि प्रिया यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
रिंकु सिंगने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाचे आमंत्रण देतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, “कुटुंबासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन, त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले, त्यांचे आशीर्वाद घेऊन खूप सन्मानित वाटत आहे. हा माझ्यासह माझ्या कुटुंबीयांसाठी खरोखरच अविस्मरणीय क्षण आहे.” दरम्यान, रिंकु आणि प्रिया यांचा साखरपुडा दोन वर्षभरापूर्वी अर्थात, 8 जून 2025 रोजी लखनौच्या ‘द सेंट्रम’ हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला होता. आता लग्न 4 डिसेंबर रोजी, लखनौच्या रामाडा हॉटेलमध्ये पार पडणार आहे. प्रिया सरोज या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मछलीशहर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत, तर रिंकु टीम इंडियातील खेळाडू असून तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करतोय.
49 वर्ष उलटली तरीही सचिन तेंडुलकरने जपून ठेवली 'ती' एक गोष्ट! फोटो शेअर करत फॅन्सला केलं थकित
मुंबई: 'मास्टर ब्लास्टर' आणि 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. क्रिकेट फॅन्समध्ये पुन्हा एकदा त्याच्या पोस्टची सोशल ...