मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पश्चिम उपनगरातील दहिसर येथील ‘आर उत्तर’ विभागातील पाटीलवाडी परिसरात प्रस्तावित विकास आराखड्यातील (डिपी) रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणारी १९ बांधकामे आज (दिनांक १८ नोव्हेंबर २०२६) निष्कासित करण्यात आली. या कारवाईमुळे सुमारे ७० मीटर लांबीचा आणि १८.३० मीटर रुंदीचा रस्ता मोकळा झाला आहे.
या ठिकाणी यापूर्वी अस्तित्वात असलेल्या रस्त्याची रुंदी केवळ ४ मीटर होती. रस्ता रुंदीकरणातील अडथळे दूर झाल्यामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडे उद्यानाजवळील वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच, मंडपेश्वर लेणी, जेबीसीएन शाळा, दहिसर गावठाण आणि मेरी इमॅक्युलेट शाळा या परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत अपेक्षित आहे. या कारवाईसाठी १ जेसीबी, २ डम्पर, ५ अभियंते आणि १६ कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती.
Khanna House Worli: वरळीतील खन्ना हाऊसच्या पुनर्विकास प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरी
मुंबई (विशेष प्रतिनिधी): वरळीतील खन्ना कंस्ट्रक्शन हाऊस कमर्शियल प्रिमायसेस संस्थेच्या पुनर्विकास प्रस्तावाला सुधार समितीने मंजुरी दिली आहे. हा ...
उप आयुक्त (परिमंडळ ७) मनिष वळंजू, आर उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रोहित त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. ‘आर उत्तर’ विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि उपलब्ध संसाधनांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, मोकळ्या झालेल्या रस्त्यावर तातडीने सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत रस्ते विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.