Thursday, November 19, 2026

Mumbai Railway News: मध्य रेल्वेचा कसारा मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक; लोकलसह मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

या ब्लॉकचा परिणाम उपनगरीय लोकल सेवांसह काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेने कसारा येथे 21 आणि 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम आणि कसारा यार्डमधील अप यार्ड लाईनच्या विस्तारीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम उपनगरीय लोकल सेवांसह काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणार आहे.

ब्लॉक किती वाजेपर्यंत असणार?

21 नोव्हेंबर रोजी रात्री 11.10 वाजल्यापासून 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1.40 वाजेपर्यंत खर्डी आणि कसारा स्थानकांदरम्यान अप मेन लाईन आणि तिसऱ्या मार्गिकेवर हा ब्लॉक असेल. या कालावधीत खर्डी आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

ब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकात पुढील बदल करण्यात आले आहेत.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून रात्री 9.32 वाजता सुटणारी कसारा लोकल आसनगाव येथेच थांबवण्यात येईल.
  • रात्री 10.47 वाजता सुटणारी CSMT-कसारा लोकल 18 मिनिटे उशिराने म्हणजे रात्री 11.05 वाजता सुटेल. ही लोकल खर्डी स्थानकाजवळ 25 ते 30 मिनिटे थांबवण्यात येईल.

ब्लॉकपूर्वीची आणि ब्लॉकनंतरची शेवटची लोकल

  • कसाऱ्याकडे जाणारी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल CSMT येथून रात्री 8.44 वाजता सुटेल.
  • CSMT कडे येणारी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कसारा येथून रात्री 10 वाजता सुटेल.
  • कसाऱ्याकडे जाणारी ब्लॉकनंतरची पहिली लोकल CSMT येथून रात्री 11.05 वाजता सुटेल.
  • CSMT कडे येणारी ब्लॉकनंतरची पहिली लोकल कसारा येथून 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.51 वाजता सुटेल.

मेल आणि एक्सप्रेस गाड्यांनाही विलंब

ब्लॉकदरम्यान खालील डाउन दिशेने जाणाऱ्या गाड्या कसारा येथे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावतील.

गाडी क्रमांक गाडीचे नाव
12322 CSMT-हावडा मेल
12167 लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेस
01079 CSMT-गोरखपूर विशेष
12141 लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र एक्सप्रेस
11057 CSMT-अमृतसर एक्सप्रेस
12811 लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया एक्सप्रेस
22177 CSMT-बनारस महानगरी एक्सप्रेस
22538 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस

तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक

आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका हा कल्याण-कसारा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिका प्रकल्पाचा भाग आहे. या मार्गिकेमुळे मेल आणि एक्सप्रेस गाड्या तसेच उपनगरीय लोकलची वाहतूक स्वतंत्रपणे हाताळणे शक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वेची वाहतूक क्षमता वाढण्यास आणि गाड्यांचे नियोजन अधिक सुलभ होण्यास मदत होईल.

प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >