
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट (churchgate) आणि मुंबई सेंट्रल (Mumbai Central) स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री अरुण कुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक रविवारी सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो लाईनवर असणार आहे.
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार धनुष, ममूटी आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'ओम: ऑपरेशन मोल' (OM: Operation Mole) हा चित्रपट ...
प्रवासातील महत्त्वाचे बदल
फास्ट लाईनवरून धावणाऱ्या गाड्या : ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान स्लो लाईनच्या सर्व उपनगरीय गाड्या फास्ट लाईनवरून चालवण्यात येतील.
रद्द होणाऱ्या गाड्या : या कामामुळे काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहणार आहेत.
शॉर्ट टर्मिनेशन : चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे किंवा दादर स्थानकांपर्यंतच चालवल्या जातील.
ब्लॉकमुळे नेमक्या कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत किंवा त्यांच्या वेळेत बदल झाला आहे, याची सविस्तर यादी उपनगरीय विभागातील सर्व स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवारी कामासाठी किंवा प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन वेळापत्रकानुसारच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






