Firecracker Ban: मुंबईत रॉकेट आणि आकाशात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर बंदी; महापालिका प्रशासनाने दिले आदेश

प्रशासनाने असे फटाके जप्त करून नष्ट करण्याची केली मागणी

मुंबई (विशेष् प्रतिनिधी): मुंबई महापालिका सभागृहात पुन्हा एकदा दिया मिर्झा यांच्या नावाचे फटाके फोडण्याच्या प्रयत्न केला. दिया मिर्झा यांनी आवाहन केलेला व्हिडीओ काढल्याने आगी लागण्याचे आणि पर्यायाने पर्यावरणाचा मुद्दा मनसेने उपस्थित केला. परंतु या आगीच्या घटना या केवळ रॉकेट आणि आकाशात उडवले जाणारे फटाके यामुळे लागल्याने अशा फटाके यापुढे मुंबईत जप्त केले जावे आणि जप्त केलेल्या फटाके नष्ट केले जावे. तसेच यासाठी दंडात्मक कारवाई केली जावी अशीही मागणी केली.(Air Pollution)






मुंबईत ऐन दिवाळीत न्यायालयाच्या निर्देशानंतरही पर्यावरणाचे समतोल राखला गेला नाही असे सांगत मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.न्यायालयाने सर्व सार्वजनिक रस्ते, गल्ल्यांमध्ये फटाके फोडण्यास बंदी घातली. तसेच शांतता क्षेत्रांत फटाके फोडण्यावर पूर्ण प्रतिबंध घातला आहे. उच्च न्यायालयाने हे आदेश स्यु मोटो दाखल करून दिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने आणि पर्यायाने पर्यावरण विभागाने याबाबत जनजागृती करून नागरिकांना दिवाळीमध्ये कमी आवाजाचे फटाके वाजवून न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन केले होते. याबाबतचा दिया मिर्झा यांचा व्हिडीओ काढण्यात आला आणि न्यायालयाने हा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश दिलेला असतानाही अपलोड झाला नाही. दिया मिर्झा यांच्या व्हिडिओला आपला आक्षेप का असावा? त्यांचा व्हिडिओ काढण्यात का आला असा सवाल त्यांनी केला. कारण या मुंबईत यंदा जे सर्वाधिक फटाके वाजले आणि त्यामुळे आगी लागण्याचे प्रकार घडले त्याला आपण दिया मिर्झा यांच्या आवाहनाच्या व्हिडीओला केलेला विरोध हाच असून आपल्या या विरोधामुळे लोकांनी यंदा अधिक फटाके फोडले, असाही आरोप केला. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी या मुद्दयाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडीओ न्यायालयाच्या निर्देशानंतरही अपलोड न करता न्यायालयाच्या अवमान केल्याचा आरोप केला. यावर भाजपच्या प्रिती सातम यांनी हा व्हिडीओ हटवला म्हणून हे फटाके अधिक वाजवले आणि त्यामुळे आगी लागल्या हा शोध यांनी कुठून लावला. आगी लागण्यास कारणीभूत असणारे रॉकेट आणि आकाशात उडवणारे फटाके हे काय आम्ही विकत होतो काय?ज्याप्रकारे सिमेवर जवान तैनात आहोत म्हणून हा देश सुरक्षित आहे त्याचप्रमाणे अग्निशमन दलाचे जवान तैनात आहेत म्हणून ही मुंबई आणि आपण प्रत्येक आपत्कालिन घटनांपासून सुरक्षित आहोत. त्यामुळे हे अग्निशमन दलाचे जवान आपल्यासाठी खरे हिरो आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये लागलेल्या आगींमध्ये त्यांनी ते काम केले त्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतूक त्यांनी केले. तर भाजपचे प्रविण छेडा यांनी हे आम्ही योग्य ठिकाणी रॉकेट लावले आहे असे सांगितले. तर विक्रम राठोड आणि प्रकाश दरेकर यांनीही किल्लेदार यांच्या मुद्दयाला विरोध केला. एमआयएमचे विजय उबाळे यांनी आपल्या विभागांत विभागातील नागरिकांनी आग विझवल्याचा सांगितले.(Clean Air Mumbai)






यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी किल्लेदार यांच्या आपल्या हरकतीच्या मुद्दयामध्ये न्यायालयाचा दाखला दिला याचे समर्थन करताच दिया मिर्झा प्रकरणी केलेल्या मुद्दयांना विरोध केला. आगी लागण्याचे काम रॉकेटमुळे झाले आहे , त्यावर बंदी आणा, सिंगल रॉकेट असेल तर त्यावरही बंदी आणली गेली पाहिजे असे सांगत पुढील वर्षी जर अशाप्रकारचे फटाके असतील तर जप्त केले जावे अशी सूचना केली. तसेच सरकारच्या आणि महापालिकेच्या प्रकल्पांना विरोध करतात त्यांना सेलिब्रेटी म्हणून का घ्यावे, त्यांना आमचा विरोध असेल असे खणकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने किल्लेदार यांच्या हरकतीच्या मुद्दयाला खणकर यांनी विरोध केला.(Mumbai Air Quality)

Comments
Add Comment

महापालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयात एमआरआय सुविधा , महापौर रितू तावडे यांच्‍या हस्‍ते झाले लोकार्पण

 मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई सेंट्रल येथील बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला

अ‍ॅमस्टरडॅमच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अ‍ॅमस्टरडॅम नगरीच्‍या महापौर फेम्के हलसेमा यांनी आज,

भांडुप संकुलातील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कामाला गती; अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भांडुप नवीन जलशुद्धीकरण

Andheri Kurla Road : अंधेरी-कुर्ला मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार, तब्बल १३.४० मीटर रुंदीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुंबई

Mumbai Tunnel Project : मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘पाताळ लोक’चा उतारा!

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आता जमिनीखालून रस्त्यांचे जाळे

Mumbai Railway News: मध्य रेल्वेचा कसारा मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक; लोकलसह मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मध्य रेल्वेने कसारा येथे 21 आणि 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय