Hariyana Crime: बनावट सिगारेटचा मोठा साठा जप्त; सोनिपतमधील कारखान्यावर पोलिसांचा छापा

हरियाणातील रोहिणी पोलिसांनी बनावट सिगारेटच्या अवैध व्यापाराविरोधात मोठी कारवाई करत २ लाख ६९ हजार ६०० बनावट सिगारेट्स जप्त केल्या असून सोनिपत येथील कुणाल नामक आरोपीला अटक केली आहे.

बनावट सिगारेटच्या अवैध व्यापाराविरोधात कारवाई करताना, हरियाणा येथील रोहिणी जिल्हा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोनिपत येथील कुणाल याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून २,६९,६०० बनावट सिगारेट्स जप्त करण्यात आल्या. सिगारेट्सच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा महिंद्रा पिकअप ट्रकही जप्त करण्यात आला. आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांनी हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील कुंडली येथील नथुपूर गावात एका संशयित अवैध सिगारेट निर्मिती युनिटचा पर्दाफाश केला. सिगारेट बनवण्याची अनेक यंत्रे, दोन रॅपिंग मशीन आणि मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त करण्यात आला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली की, दक्षिण रोहिणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट सिगारेटचा साठा पोहोचवला जात आहे. या माहितीच्या आधारे एसआय अशोक तोमर, हेड कॉन्स्टेबल नजमू आणि सुमित यांचा समावेश असलेल्या पथकाने रोहिणी सेक्टर ३ मध्ये सापळा रचला. यादरम्यान कुणालला महिंद्रा पिकअपमध्ये पकडण्यात आले. त्याच्याकडून बनावट सिगारेट्स जप्त करण्यात आल्या. त्यानंतर दक्षिण रोहिणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार एफआयआर दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.






चौकशीदरम्यान, सोनिपत येथील कुंडलीतील नथुपूर गावचा रहिवासी असलेल्या आरोपी कुणालने सांगितले की, सिगारेटचा हा साठा नथुपूरमधील एका अवैध उत्पादन युनिटमधून आणण्यात आला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सोनिपतमधील एका केंद्रावर छापा टाकला, जिथे त्यांना बनावट सिगारेट निर्मितीचा संशयित प्रकार आढळून आला. पोलिसांनी ९७ किलोग्राम बनावट सिगारेट बॉक्स कव्हर्स, २०.४ किलोग्रॅम बनावट फिल्टर रोल्स आणि १७.७ किलोग्रॅम साधे पांढरे फिल्टर्स जप्त केले. त्यांनी सिगारेट बनवण्याचे एक मशीन आणि दोन रॅपिंग मशिनदेखील जप्त केले. या अवैध व्यापारात सामील असलेल्या इतर व्यक्तींना ओळखण्याचे काम पोलीस आता करत आहेत. बनावट सिगारेटचे उत्पादन कोठे होत होते आणि त्यांचा पुरवठा कोणत्या भागांमध्ये केला जात होता, याचा तपास ते करत आहेत. या प्रकरणातील इतर संशयितांना अटक करण्यासाठी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 84 धार्मिक संस्थांची नोंदणी, भाविकांची सेवा करणाऱ्या संस्थांना सरकार देणार आर्थिक मदत

नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी हळूहळू वेग घेत आहे. कुंभमेळ्यासाठी

Narendra Modi statement today : आव्हानांना भिडण्याची ताकद भारतामध्ये आहे; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन!

देशातील नागरिकांनी स्वतःच्या मनात निर्माण केलेली भीती आणि मर्यादांची चौकट मोडून बाहेर पडावे, असे आवाहन

Maherchi Sadi Sequel: ‘माहेरची साडी 2’ बनला तर लक्ष्मी आणि विकी कोण? अजिंक्य देव यांनी सुचवली कलाकारांची नावं

Maherchi Sadi Sequel: 90च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'माहेरची साडी' हा चित्रपट. 1991

Nashik Crime News : पंचवटीत भरदिवसा तरुणाची हत्या, परिसरात खळबळ

नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचवटीतील टकलेनगर परिसरात शुक्रवारी (दि. २०) भरदुपारी

Sugar Price Hike : महागाईचा गोडवा कडू! सणासुदीशिवायच साखरेच्या दरात मोठी उसळी; जाणून घ्या प्रमुख शहरांतील ताजे दर

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडवणारी बातमी समोर आली आहे. कोणताही सण-उत्सव

Om Operation Mole: धनुषच्या ‘ओम’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग

Om Operation Mole: धनुषचा 'ओम' आणि जपानी मॉन्स्टर चित्रपट 'गॉडझिला मायनस झिरो' हे दोन मोठे चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित