Maherchi Sadi Sequel: ‘माहेरची साडी 2’ बनला तर लक्ष्मी आणि विकी कोण? अजिंक्य देव यांनी सुचवली कलाकारांची नावं

'माहेरची साडी' या चित्रपटाचा सिक्वेल बनला तर कोणते कलाकार त्या पात्रासाठी योग्य असतील, असे विचारण्यात आले, त्यावर अजिंक्य देव यांनी सुबोध भावेचं नाव सुचवलं. तसंच अलका कुबल यांच्या भूमिकेसाठी तेजश्री प्रधान योग्य ठरेल, असं अजिंक्य देव म्हणाले.

Maherchi Sadi Sequel: 90च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'माहेरची साडी' हा चित्रपट. 1991 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या चित्रपटाने मराठी मनोरंजन विश्वाला वेगळी ओळख मिळवून दिली. चित्रपटाची नायिका लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री अलका कुबल यांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतला. अलका कुबल, अजिंक्य देव, रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, विक्रम गोखले आणि आशालता वाबगावकर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने महाराष्ट्रातील महिलांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्याकाळी चित्रपटाने 12 कोटींची कमाई केली होती. तो चित्रपट त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा ठरला. तब्बल 100 हून अधिक आठवडे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये सुरू होता.


माहेरची साडी या सिनेमाचा दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केलं होत, त्याचा सीक्वेल यावा अशी अनेकांची इच्छा आहे. मधल्या काही काळात विजय कोंडके यांनी मी माहेरची साडी 2 वर काम करत आहेत असं देखील सांगितलं होतं. सिनेमाची कथा तयार आहे. तंत्रज्ञ आणि कलाकार शोधत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.






या चित्रपटामुळे अभिनेता अजिंक्य देव यांच्या लोकप्रियतेतही मोठी भर पडली. चित्रपटात अजिंक्य देव यांनी लक्ष्मीच्या भावाची म्हणजेच विकीची भूमिका साकारली होती. त्यातच आता या चित्रपटाचा सीक्वल बनवला तर त्यात आजच्या काळातील कोणते कलाकार असावेत, याबद्दल अजिंक्य देव यांना एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आले.



अजिंक्य देव यांनी सांगितले 'या' अभिनेत्रीचे नाव


अजिंक्य देव यांनी नुकताच एका चॅनेलला मुलाखत दिली, त्यात त्यांना चित्रपटातील त्यांचे पात्र विकी आणि लक्ष्मी म्हणजेच अलका कुबल यांच्या भूमिकेत 'माहेरची साडी' या चित्रपटाचा सिक्वेल बनला तर कोणते कलाकार त्या पात्रासाठी योग्य असतील, असे विचारण्यात आले, त्यावर अजिंक्य देव यांनी सुबोध भावेचं नाव सुचवलं. तसंच अलका कुबल यांच्या भूमिकेसाठी तेजश्री प्रधान योग्य ठरेल, असं अजिंक्य देव म्हणाले. तर खाष्ट सासूच्या भूमिकेत उषा नाडकर्णी यांचंच नाव घेतलं. "ती मला वाटतं उषाच करेल अजूनही. तिनेच करावं, तीच खाष्ट होऊ शकते," असं अजिंक्य देव मजेशीरपणे म्हणाले.

Comments
Add Comment

Om Operation Mole: धनुषच्या ‘ओम’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग

Om Operation Mole: धनुषचा 'ओम' आणि जपानी मॉन्स्टर चित्रपट 'गॉडझिला मायनस झिरो' हे दोन मोठे चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित

Bollywood Entertainment News: भाईजानने श्रद्धा कपूरची मागितली माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची बॉक्स ऑफिस टक्कर

Bollywood Entertainment News: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट

Jijai Movie : स्त्रीशक्तीचा धगधगता अवतार! रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल

मुंबई :  घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी,

OM MOVIE REVIEW : 'पुष्पा'लाही मागे टाकणार ? धनुष-ममूटींचा 'OM: Operation Mole' चित्रपटगृहात दाखल; वाचा प्रेक्षकांचा पहिला रिव्ह्यू!

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार धनुष, ममूटी आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका

Bigg Boss 20 Extension: TRP चा धमाका! 'बिग बॉस 20' आणखी 2 ते 4आठवडे वाढणार?

Bigg Boss 20 Extension: सर्वाधिक चर्चेत असणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. 6 सप्टेंबर 2026 रोजी सुरू

Kriti Sanon Dating: लंडन, ग्रीस आणि आता वाढदिवसाची पोस्ट! क्रिती-कबीरच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता

Kriti Sanon Dating: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉन सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत