BMC Action : मालाड येथील नाहर नगर मार्गाचे रुंदीकरण,अडथळा आणणारी १७ बांधकामे हटवली, ‘पी पश्चिम’ विभागाची कारवाई*

सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


पी पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्ग येथे प्रस्तावित १८.३० मीटर रुंदीच्या विकास नियोजन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बुधवारी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १७ बांधकामे हटवण्यात आली आहे.
सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


रस्त्यांवरील वाहतुकीचे अडथळे दूर करून वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.या ठिकाणी सद्यस्थितीत या मार्गाची रुंदी केवळ ४ मीटर होती. या कारवाईनंतर सुमारे ३० मीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित १८.३० मीटर रुंदीपर्यंत मोकळा करण्यात आला आहे. या रुंदीकरणामुळे गिरीश केणी चाळीजवळील मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर झाला आहे. या कारवाईमुळे प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.


सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी पश्चिम विभाग) कुंदन वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत परिरक्षण भागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, मोकळा करण्यात आलेला रस्ता वाहतुकीसाठी तातडीने खुला करता यावा, यासाठी रस्ते विभागाला सिमेंट काँक्रीटचा रस्ता त्वरित तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीरामांचा अपमान खपवून घेणार नाही, हिंदु जनजागृती समिती आक्रमक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' चित्रपटात मूळ कथेचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीराम,

Central Railway : नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या 2 विशेष लोकल; कल्याण आणि पनवेलहून मध्यरात्री सुटणार

मुंबई : ‘डब्ल्यूएनसी नेव्ही हाफ मॅरेथॉन-2026’ मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 2 विशेष

Western Railway Mega Block : रविवारी पश्चिम रेल्वेचा ५ तासांचा जम्बो ब्लॉक; चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान रेल्वे वाहतुकीत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे.

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; फरार अभिषेक पंडितविरोधात 'लूकआऊट' जारी, पत्नीला अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अधिक

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; फरार अभिषेक पंडितविरोधात लुकआऊट नोटीस

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील

Samantha Ruth Prabhu news : समंथा प्रभू आणि राज निदिमोरू यांच्या घरी चिमुकल्या 'देव'चे आगमन; पहिला फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Prabhu) आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्या संसारात एका