विधान भवन आणि एअर इंडिया इमारतीजवळील खाद्य स्टॉल्सवर FDAचा दंड; ज्यूस स्टॉलचा परवाना निलंबित

मुंबईतील विधान भवन आणि नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीच्या परिसरातील खाद्य स्टॉल्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष तपासणी मोहीम राबवली. 28 आस्थापनांची तपासणी करत स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 1.57 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर विधान भवनाजवळील एका ज्यूस स्टॉलचा परवाना निलंबित करण्यात आला.

विधान भवन आणि नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीच्या परिसरात कार्यरत असलेले खाण्याचे स्टॉल्स आणि खाद्य विक्रेते अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले आहे. एफडीएने एका विशेष तपासणी मोहिमेदरम्यान त्यांच्यावर एकूण १.५७ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. एफडीएने या दोन्ही ठिकाणांवरील २८ आस्थापनांची तपासणी केली आणि स्वच्छतेची मानके न पाळल्याबद्दल विधान भवनाजवळच्या एका ज्यूस स्टॉलचा परवाना निलंबित केला. एअर इंडियाच्या इमारतीजवळ १५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी १३ आस्थापनांवर एकूण ९०,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. विधान भवनाच्या परिसरात १३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आणि ६७,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला.


विधान भवनाजवळच्या 'फ्रेश एन ज्यूस' स्टॉलचा परवानाही निलंबित करण्यात आला. तपासणीत असे आढळून आले की, अनेक आस्थापने त्यांच्या परवान्यांतर्गत आवश्यक असलेल्या स्वच्छतेच्या अटींचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्या होत्या. एफडीएने चर्चगेटमधील जनता फास्ट फूड सेंटरला ६०००० रुपये आणि वांद्रे पश्चिममधील झमझम ज्यूस सेंटरला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई एका व्यापक राज्यव्यापी मोहिमेचा भाग होती, ज्यामध्ये एफडीएने दोन दिवसांत ३ आस्थापनांवर कारवाई केली. यात मुंबईतील १३ आस्थापनांचा समावेश आहे. शुक्रवारी पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. यामध्ये अंधेरी पश्चिममधील खा बर्गर, वडाळ्यातील ब्लिंक कॉमर्स आउटलेट, माझगावमधील श्री प्रसाद बेकरी आणि दादर पश्चिममधील आझाद आईस्क्रीम यांचा समावेश होता.






एफडीएने गेल्या दोन दिवसांत राज्यभरातून ३.५२ कोटी रुपयांचा अन्नसाठाही जप्त केला आहे. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिक गंभीर प्रकारणांपैकी एक प्रकरण मालाडमधील रामचंद्र लेनवर असलेल्या 'माईस मेक्सिकन किचन'मध्ये उघडकीस आले. एफडीएच्या अधिकाऱ्यांना साठवणुकीच्या रॅक्सवर आणि कंपनीने पॅक केलेल्या क्विनोआच्या पाकिटांमध्ये १० ते १५ झुरळे आढळली. एफडीएने अन्न व्यवसायांना त्यांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आणि कच्च्या व शिजवलेल्या अन्नासोबतच शाकाहारी व मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवण्यासह विहित स्वच्छता नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Better Roads For Dharavi: धारावीतील खराब रस्त्यांची होणार सुधारणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी शहरांसह उपनगरांतील डांबरी रस्त्यांसह जुन्या

काळाचौकीच्या टेक्सटाईल म्युझियमची जागा BMC कडे हस्तांतरित, मुंबई महापालिकेला भरावा लागणार मेट्रो सेस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे पसरले असून या मेट्रो रेल्वेचा पसारा वाढू लागल्यानंतर यासाठीचा

Bhagwati Hospital: भगवती रुग्णालयांतील रुग्णांवरील उपचारासाठी जून उजाडणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालकीचे बोरीवलीतील हरिलाल भगवती मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता

गटारांच्या झाकणांनाही साखळीद्वारे करणार लॉक, BMC चा महत्त्वाचा निर्णय

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई शहरातील अनेक रस्ते आणि पदपथांखालून जाणाऱ्या पर्जन्य जलवाहिनींच्या मनुष्यप्रवेश

Mumbai Book Festival: मुंबईत २४ नोव्हेंबरपासून पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : पुस्तकप्रेमी, साहित्यिक आणि वाचकांसाठी मुंबईत येत्या २४ नोव्हेंबरपासून सहा दिवसांचा पुस्तक महोत्सव

Maharashtra State Government Decision: क्राईम ब्रँच, आर्थिक गुन्हे शाखेला आता पोलीस ठाण्याचा दर्जा; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला (क्राईम ब्रँच) आणि आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) आता अधिकृतपणे पोलीस